Sunday, March 10, 2024

राजकीय कुसंगत...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

राजकीय कुसंगत

आचारसंहिता म्हणजे खोळंबा,
एवढाच आपला आडाखा आहे.
राष्ट्रीय महापुरुषांना सुद्धा,
आता आचारसंहितेचा तडाखा आहे.

पक्ष - पक्षाचा आणि जातीपातीचा,
महापुरुषांवरतीही शिक्का आहे.
म्हणूनच महापुरुषांच्या प्रतिमानांही,
आता आचारसंहितेमुळे धक्का आहे.

काढून टाका; झाकून टाका,
आचारसंहितेची नियमावली आहे !
राजकीय कुसंगतीमुळे,
महापुरुषांची ही गत झाली आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8500
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
10मार्च2024
 

No comments:

खाते वाटप ..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- खाते वाटप कुणाला आवडीचे भेटले गेले, कुणाला नावडीचे भेटले गेले. जे जे बिन खात्याचे मंत्री होते, त्य...