आजची वात्रटिका
-------------------------
साईड ट्रॅक
झुक झुक करता करता,
इंजिन झुकायला लागले.
मुख्य ट्रॅकच्या बाजूला,
ट्रॅक टाकायला लागले.
समांतर रूळ कधीच,
एकमेकांना जुळत नाही.
इंजिनचे वागणे काही,
रेल्वे रुळाला कळत नाही.
कधी ठेंगा;कधी भोंगा,
गरगरलेला ब्रेन आहे !
हिरवा झेंडा दाखवते
ती बुलेट ट्रेन आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8509
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
20मार्च2024
No comments:
Post a Comment