आजची वात्रटिका
-------------------------
इलेक्शन फॉर्मुला
ताणाताणी आणि आणीबाणी करून,
इलेक्शन फॉर्मुला केला जातो.
कधी नवा तर कधी जुना,
इलेक्शन फॉर्मुला दिला जातो.
शत्रु पक्षाबरोबर मित्र पक्षाला,
अगदी बरोबर कोंडीत गाठले जाते.
इलेक्शन फॉर्मुल्याचे गणित,
काही हातचे राखून सुटले जाते.
इलेक्शन पूर्व आणि इलेक्शनोत्तर
फॉर्मुल्यांचे प्रकार पडले जातात !
हाती सत्ता आली की,
मित्रांनाही फॉर्मुले नडले जातात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8491
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
1मार्च2024
No comments:
Post a Comment