आजची वात्रटिका
-------------------------
पंचवार्षिक भ्रम
जसे त्यांना यांना लोळवायचे आहे,
तसे यांनाही त्यांना लोळवायचे आहे.
त्यांच्या लोळवा-लोळवीत,
सगळ्यांना लोकांना खेळवायचे आहे.
एकदा लोकांना लोळविले की,
लोकशाहीला लोळविण्यासारखे आहे.
एकदा लोकांना खेळविले की,
लोकशाहीला खेळविण्यासारखे आहे.
लोकांपासून लोकशाहीपर्यंत,
त्यांच्या राजकीय चालीचा क्रम आहे !
सतत लोळविता आणि खेळविता येते,
हा त्यांचा तर पंचवार्षिक भ्रम आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8495
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
5मार्च2024
No comments:
Post a Comment