आजची वात्रटिका
-------------------------
निवडणुकीचा फेरा
रुसवे फुगवे सुरू झाले,
अंतर्गत हेवदावे सुरु आहेत.
कटकारस्थान,षडयंत्र,
गनिमी कावे सुरू आहेत.
पोटामधली मळमळ,
ओठावरती यायला लागली.
कालची संवादाची भाषा,
विसंवादी व्हायला लागली.
जिथे आरत्या गायल्या गेल्या,
तिथेच आता कलगी तुरा आहे !
ज्याच्यातून कुणीच सुटत नाही,
तो निवडणुकीचा फेरा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8493
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
3मार्च2024
No comments:
Post a Comment