आजची वात्रटिका
-------------------------
उलटी गंगा
कुणी दाखवतो उपयोगिता मूल्य,
कुणी उपद्रव मूल्य दाखवतो आहे.
कुठे एखादा चेलाच,
आपल्या गुरुलाच शिकवतो आहे.
कुठे आपलीच विद्या,
एखाद्या गुरूला फळते आहे.
ज्याच्या बुडाखाली आग लागली,
त्यालाच खरी धग कळते आहे.
कुठे चेले एवढे इरसाल झालेत की,
वाटते त्यांचा गुरुच कच्चा आहे !
ज्याचे उपद्रव मूल्य सर्वात जास्त,
वाटते नेमका तोच सच्चा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8504
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
14मार्च2024
No comments:
Post a Comment