Thursday, March 21, 2024

गोपाळकाल्याचे सूत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

गोपाळकाल्याचे सूत्र

जसा इकडे झाला आहे,
तसा तिकडेही झाला आहे.
एकूण काय तर सर्वच पक्षांचा,
चक्क गोपाळकाला आहे.

कुणाचा दुसऱ्या;कुणाचा तिसऱ्या,
तिसऱ्या चौथ्या पक्षात प्रवेश आहे.
घर वापसीच्या बाबतीतही,
अगदी सारखाच नमुना पेश आहे.

ज्यांच धिक्कार; त्यांचाच स्वीकार,
असेच आजचे राजकीय चित्र आहे !
आजची राजकीय अपरिहार्यता,
हेच गोपाळकाल्याचे सूत्र आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8510
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
21मार्च2024
 

No comments:

खाते वाटप ..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- खाते वाटप कुणाला आवडीचे भेटले गेले, कुणाला नावडीचे भेटले गेले. जे जे बिन खात्याचे मंत्री होते, त्य...