Wednesday, March 6, 2024

जागा वाटपाची तडजोड...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डॊळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------------------

जागा वाटपाची तडजोड

लोकसभेच्या वाटाघाटीत,
विधानसभेचा पाय अडकला आहे.
जागा वाटपाच्या समीकरणात,
ज्याचा त्याचा झेंडा फडकला आहे.

कुणाला लोकसभा महत्त्वाची,
कुणाला विधानसभा महत्त्वाची आहे.
जागा वाटपाच्या तडजोडी करताना,
परीक्षा आपल्याच सत्वाची आहे.

भोवतालचा बघायची सवय झाली,
कारण आंधळे उरावर स्वार आहे !
जिकडे बघावे तिकडे,
तोंड दाबून बुक्क्यांचा मार आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8496
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
6मार्च2024

 

No comments:

खाते वाटप ..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- खाते वाटप कुणाला आवडीचे भेटले गेले, कुणाला नावडीचे भेटले गेले. जे जे बिन खात्याचे मंत्री होते, त्य...