Saturday, March 30, 2024

मैत्रीपूर्ण लढत...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

मैत्रीपूर्ण लढत

आपलेच घोडे पुढे दामटत,
जो तो आघाडीचा अंत बघू लागतो.
आघाड्यात बिघाड्या झाल्या की,
मैत्रीपूर्ण लढतीचा मार्ग निघू लागतो.

मैत्रीपूर्ण लढत म्हणजे,
वरवरती लुटुपुटूची लढत असते.
विरोधकांच्याच पत्थ्यावरती,
मैत्रीपूर्ण लढत पडत असते.

कार्यकर्त्यांची भागते हौस,
कुणाचा कंडही जिरला जातो !
मैत्रीपूर्ण लढत म्हणजे,
आत्मघाती मार्ग ठरला जातो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8518
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
30मार्च2024
 

No comments:

खाते वाटप ..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- खाते वाटप कुणाला आवडीचे भेटले गेले, कुणाला नावडीचे भेटले गेले. जे जे बिन खात्याचे मंत्री होते, त्य...