Saturday, March 2, 2024

लोकशाहीचे नातेगोते...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

लोकशाहीचे नातेगोते

राजकीय महत्त्वकांक्षापुढे,
कुठे कुणाची गय असते?
कुठे जाऊ विरुद्ध जाऊ,
कुठे ननंदविरुद्ध भावजय असते.

भावा विरुद्ध भाऊ लढतो,
जावया विरुद्ध सासरा असतो.
कौटुंबिक लढायामध्ये तर,
भाऊबंदकीचा आसरा असतो.

कुठे भावाविरुद्ध बहीण,
कुठे सूनविरुद्ध सासू असते !
एका डोळ्यात आसू तर,
दुसऱ्या डोळ्यात हसू असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8492
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
2मार्च2024
 

No comments:

खाते वाटप ..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- खाते वाटप कुणाला आवडीचे भेटले गेले, कुणाला नावडीचे भेटले गेले. जे जे बिन खात्याचे मंत्री होते, त्य...