Thursday, March 7, 2024

पोल - खोल...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

पोल - खोल

नेते आणि कार्यकर्ते तेच,
झेंडा आणि गोंडा वेगळा आहे.
बुडखा आणि खोड तेच,
फक्त वरचा शेंडा वेगळा आहे.

वरचा शेंडा वेगळा असला तरी,
ते नाक उचलून बोलत आहेत.
एकमेकांची पोल सुद्धा,
अगदी मुळापासून खोलत आहेत.

त्यांची चालली पोल खोल,
जोरात एकमेकांचे उणेदुणे आहे !
लोकांना पश्चाताप व्हायला लागला,
हे तर आपणच पेरलेले बेणे आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8497
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
7मार्च2024
 

No comments:

daily vatratika...3april2025