आजची वात्रटिका
-------------------------
केविलवाणी अवस्था
जिकडे बघावे तिकडे,
बंडाळी एके बंडाळी आहे.
कुठे खूपसला पाठीत खंजीर,
कुठे निष्ठेची खांडोळी आहे,
विश्वासपात्र नसणारांकडूनच,
विश्वासघाताची बोंबाबोंब आहे.
जसे तुळशी वृंदावनात,
फक्त गांज्याचेच ठोंब आहे.
फक्त स्वार्थ आणि स्वार्थावरच,
राजकारण्यांचा जीव आहे !
त्यांच्या केविलवाण्या तडजोडीमुळे,
त्यांचीच आता कीव आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8517
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
No comments:
Post a Comment