-------------------------
राजेशाहीचा पगडा
लोकशाही म्हणजे काय?
प्रत्येकाला मोकळे पटांगण आहे.
त्यामुळेच लोकशाहीचेही,
राजेशाहीपुढे लोटांगण आहे.
लोकशाहीच्या वळचणीला,
हल्ली राजे महाराजे आहेत.
याची उदाहरणे जसे जुने,
तसे अगदीच ताजे आहेत.
लोकशाही आणि राजेशाही,
तसे तर विरुद्धार्थी शब्द आहेत !
तरीही लोकशाहीतले मतदार राजे,
राजेशाहीवरतीच लुब्ध आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8514
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
25मार्च2024
No comments:
Post a Comment