आजची वात्रटिका
-------------------------
आचारसंहितेचा धसका
प्रत्यक्ष निवडणूक लढणारांपेक्षाही
हवालदिल मतदार राजा असतो.
निवडणुकीपेक्षा आचारसंहितेचाच,
नको त्यापेक्षा जास्त गाजावाजा असतो.
निवडणुका येतात जातात,
आचारसंहितेचाच धसका असतो.
जसा लग्नापेक्षाही महत्त्वाचा,
लोकांसाठी हळद -खिसका असतो.
निवडणुकीसाठी आचारसंहिता असते,
आचारसंहितेसाठी निवडणूक नाही !
भित्यापोटीच ब्रह्मराक्षस असतो,
त्यात मतदार राजाची काही चूक नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8506
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
17मार्च2024
No comments:
Post a Comment