Saturday, November 30, 2019

ट्रीपल डोस

आजची वात्रटिका
-------------------------------------
ट्रीपल डोस
पक्ष कोणताही असो,
त्याला सतेचा सोस आहे.
महाराष्ट्रात आंनदाचा
चक्क 'ट्रीपल डोस' आहे.
एकाचवेळी तिघांना
सुगीचे दिवस आहेत !
नांदा सौख्य भरे,
हायकमांडला नवस आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7135
दैनिक झुंजार नेता
30नोव्हेंबर2019

Friday, November 29, 2019

कौटुंबिक सोहळा


उद्धवशाही

आजची वात्रटिका
-------------------------------------
उद्धवशाही
हिंदुस्थानचा भारत झाला,
हे पटकन मार्क झाले.
कालपर्यंतचे शिवतीर्थ,
पुन्हा 'शिवाजी पार्क' झाले.
‌अनेकांना जय महाराष्ट्र करीत, ‍
सर्वसमावेशक रोल आहे.
आपलाच आपल्यावर
आता 'रिमोट कंट्रोल' आहे.
'मातोश्री'चे आशीर्वाद,
मराठी माणसाचे प्रेम,
खात्यावर जमा आहे !
किमान समान कार्यक्रम,
हाच आता 'वचननामा' आहे!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5640
दैनिक पुण्यनगरी
30नोव्हेंबर2019

Thursday, November 28, 2019

आरसा


कौतुकाचे बोल

आजची वात्रटिका
-------------------------------------
कौतुकाचे बोल
जसे वारे असेल,
तसे उफणले जाते .
मागचे सारे वैर,
उकंड्यात दफनले जाते.
राजकारण्यांचा विजय,
जनतेची दांडी असते !
जनताच कौतुकाने बोलते,
सत्ता जादूची कांडी असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5639
दैनिक पुण्यनगरी
28नोव्हेंबर2019

Wednesday, November 27, 2019

संविधान बचाव


बंडाचे मूल्यमापन



आजची वात्रटिका
-------------------------------------
बंडाचे मूल्यमापन
बंडाच्या यशापयशाबाबत
आता चर्चा तशी हीट आहे.
सिंचन घोटाळ्यात मात्र,
झटक्यात क्लीन चिट आहे.
माजी उपमुख्यमंत्र्याची
औट घटकेत पदवी आहे !
शेवटी बंड म्हणजे काय?
स्वकीयासोबत यादवी आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------------------
फेरफटका-7132
दैनिक झुंजार नेता
27नोव्हेंबर2019
---------------------------------

काकांची कमाल

आजची वात्रटिका
-------------------------------------
काकांची कमाल
निवडून आला पोरगा,
मुख्यमंत्रीपदी पप्पा आहे.
पुतण्याच्या पाठीत
काकांचा धप्पा आहे.
हे सांगण्यात का-कू नाही,
काकाने मामा बनवले आहे !
आपले भवितव्य धोक्यात आहे,
हे पुतण्यांना जाणवले आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5638
दैनिक पुण्यनगरी
27नोव्हेंबर2019

Tuesday, November 26, 2019

संविधान बचाव

आजची वात्रटिका
-------------------------------------
संविधान बचाव
ना कसली भीती,
ना कसला आडपडदा आहे.
संधी मिळेल तसा,
संविधानाचा मुडदा आहे.
संविधान जपलेच पाहिजे,
संविधान धोक्यात आहे !
संविधानाची विटंबना,
एवढेच त्यांच्या डोक्यात आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7131
दैनिक झुंजार नेता
26नोव्हेंबर2019

Monday, November 25, 2019

लोकशाहीचे विडंबन



आजची वात्रटिका
-------------------------------------
लोकशाहीचे विडंबन
सरड्याचे सारे रंग,
महाराष्ट्रात फिके आहेत.
वात्रटिका आणि व्यंगचित्रं
जेवढी बोलकी,
त्याहून ते मुके आहेत.
सगळ्या लोकशाहीचे
इथे इत्यंभूत दर्शन आहे !
आसू आणि हसूचे,
शब्दा-शब्दांत घर्षण आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7130
दैनिक झुंजार नेता
25नोव्हेंबर2019
------------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.

Sunday, November 24, 2019

ऐतिहासिक सत्य

आजची वात्रटिका
-------------------------------------
ऐतिहासिक सत्य
कुणाला दुःख वाटू शकते,
कुणाला आनंद वाटू शकते.
पुतण्या कुणाचाही असो,
तो कधी ना कधी फुटू शकतो.
राजकीय सूडाबरोबरच
हा नात्यागोत्यावर डाका असतो !
जो पुतण्याला फोडतो,
तोही कुणाचा तरी काका असतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7129
दैनिक झुंजार नेता
24 नोव्हेंबर2019

वेट अँड वॉच

आजची वात्रटिका
-------------------------------------
वेट अँड वॉच
यांनाही आणि त्यांनाही
लोकशाही वाचवायची आहे
आपली छिनालकी,
प्रत्येकाला पचवायची आहे.
कुठे शह-काटशह,
कुठे भूकंपाचे धक्के आहेत !
विरोधकांच्या छावणीत
हुकुमाचे एक्के आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5635
दैनिक पुण्यनगरी
24नोव्हेंबर2019

Saturday, November 23, 2019

अजब तुझे सरकार

आजची वात्रटिका
-------------------------------------
अजब तुझे सरकार
अमूर्त असे गाणे,
आता खरोखरच मूर्त झाले.
उद्धवा अजब तुझे सरकार,
गाण्याला नवे अर्थ आले.
चर्चेनंतर चर्चा,
घोळावरती घोळ आहे !
जिवंत होवून समोर आलेली,
गाण्याची प्रत्येक ओळ आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7128
दैनिक झुंजार नेता
23नोव्हेंबर2019

महाविकास


एका पुतण्याचे बंड



आजची वात्रटिका
______________________
एका पुतण्याचे बंड
वैचारिक महाराष्ट्राची
भ्रमिष्ट बुद्धी झाली.
आजची दैनिके,
आजच्या आज रद्दी झाली.
अखेर ते परत आलेच,
काकाला मोठा धोका आहे !
'दादा' गिरीच्या राजकारणापुढे
अख्खा महाराष्ट्र मुका आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा ( बीड)
मोबाईल.9923847269
...........................
23नोव्हेंबर2019
11:38AM

Friday, November 22, 2019

एकमत

आजची वात्रटिका
---------------------------------------
एकमत
ईव्हीएम शिवायसुद्धा
आपले मत कुणालाही जावू शकते.
ज्यांच्याकडे बहूमत नाही,
त्यांचेसुद्धा सरकार येवू शकते.
मतदानाचे मतांतर झाले
यावर आता काही दुमत नाही !
तुमच्या मताला विचारतो कोण?
त्यांचा सत्तेशिवाय जीव रमत नाही!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5633
दैनिक पुण्यनगरी
22नोव्हेंबर2019

Thursday, November 21, 2019

आजची अपडेट

आजची वात्रटिका
---------------------------------------
आजची अपडेट
इजा आहे,बिजा आहे,
सोबतीला तिजा आहे.
सत्तेच्या खेळामध्ये
आता खरी मजा आहे.
कुणी म्हणतो,अभद्र;
कुणी म्हणतो, भद्र आहे !
सत्तेच्या खुर्ची पुढे
सर्व काही शूद्र आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7127
दैनिक झुंजार नेता
21नोव्हेंबर2019

सेनेचे हृदयपरिवर्तन

आजची वात्रटिका
---------------------------------------
सेनेचे हृदयपरिवर्तन
कालच्या रोखठोक भूमिका,
आज उलट्या सुलट्या आहेत.
आधी सरकार,मग मंदीर,
अशा आलट्या पलट्या आहेत.
हातचे सोडून देवून
पळत्याच्या मागे जायची पाळी आहे.
हिंदुत्वाला लगाम लागून,
धोक्यात दहा रुपयांची थाळी आहे.
काल ज्यांना शिव्या दिल्या,
त्यांचेच आज किर्तन आहे !
ना अँजिओग्राफी,ना अँजिओप्लास्टी,
हे तर हृदयपरिवर्तन आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5632
दैनिक पुण्यनगरी
21नोव्हेंबर2019

Wednesday, November 20, 2019

घाईतला गोंधळ

आजची वात्रटिका
---------------------------------------

घाईतला गोंधळ
काही वाक्प्रचार आणि म्हणी,
रोचक आणि खोचक असतात.
पण त्याच विषारी ठरतात,
जेंव्हा त्या जातीवाचक असतात.
भाषिक सौदर्य वाढले तरी,
त्यांना आता टाळले पाहिजे !
कितीही घाई आणि गोंधळ असो,
काही बंधन पाळले पाहिजे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-7126
दैनिक झुंजार नेता
20नोव्हेंबर2019

डेथ शूट

आजची वात्रटिका
---------------------------------------
डेथ शूट
सैतानाकडून शक्य नाही ते,
माणसांकडून करण्यात आले.
पिसाळलेल्या बैलाला इन कॅमेरा,
जेसीबीने चिरडून मारण्यात आले.
बैल हैवान असूनसुद्धा,
ते असले कृत्य करणार नाहीत !
पिसाळलेली माणसे
मारायची असतील तर
जेसीबी सुद्धा पुरणार नाहीत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5631
दैनिक पुण्यनगरी
20नोव्हेंबर2019

Tuesday, November 19, 2019

शब्दच्छल

आजची वात्रटिका
---------------------------------------
शब्दच्छल
कधी ताटातूट असते,
कधी फुटाफूट असते.
तुटले आणि फुटले तरी,
त्यांचीच जुटाजूट असते.
फुटाफूट आणि जुटाजूटीचे
त्यांच्याकडून गोडवे असतात !
तेच असतात दलाल,
त्यांच्यातच भडवे असतात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-7125
दैनिक झुंजार नेता
19नोव्हेंबर2019

पॉवर गेम

आजची वात्रटिका
---------------------------------------
पॉवर गेम
पाठीत खुपसून खंजीर,
त्यांनी सत्ता भोगली आहे.
आता मारल्या कोलांटउड्या,
त्याला म्हणती,गुगली आहे.
राजकीय मुत्सद्दीपणा म्हणजे,
उठता बसता विश्वासघात आहे.
खेळले रडीचे डाव जरी,
विद्वान बोलती, व्वा क्या बात आहे?
एकास एक, दुसऱ्यास एक,
हा वैचारिक अन्याय आहे !
दोन्ही डगरीवरती हात असून,
तिसऱ्याच्या मुंडक्यावर पाय आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5630
दैनिक पुण्यनगरी
19नोव्हेंबर2019

Sunday, November 17, 2019

चॅनलचे दूर (दैव) दर्शन

आजची वात्रटिका
------------------------------------------
चॅनलचे दूर (दैव) दर्शन
ब्रेकींग न्यूज म्हणजे,
वावड्यावर वावड्या आहेत.
न्यूज चॅनल्स म्हणजे,
विडी फुक्यांच्या चावड्या आहेत.
सर्वात आधी,सर्वात पुढे,
हे वेड तर बघा केवढे आहे?
चावड्यावरच्या वावड्यांना,
' न्यूज व्हॅल्यू ' चे वावडे आहे !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7123
दैनिक झुंजार नेता
17नोव्हेंबर2019

राजरंग

आजची वात्रटिका
------------------------------------------
राज - रंग
आज विश्वासार्ह वाटणारे,
कालचे विश्वासघातकी आहेत.
आज पुण्यवान भासले तरी,
कालचे महापातकी आहेत.
इतिहासाची पाने चाळा,
पाहिजे तेवढे दाखले आहेत !
लोकांची दयाबुद्धी जागी होते,
म्हणूनच ते सोकले आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5628
दैनिक पुण्यनगरी
17नोव्हेंबर2019

Saturday, November 16, 2019

सुखाची गुरुकिल्ली

आजची वात्रटिका
------------------------------------------
सुखाची गुरुकिल्ली
सुख,समाधान,शांतता,एकी,
हा आपला निव्वळ भ्रम असतो.
कुणाचाही सुखी संसार म्हणजे,
किमान समान कार्यक्रम असतो.
कितीही जीवाची मुंबई केली तरी,
खूप दूरवरती दिल्ली असते !
किमान समान कार्यक्रम हीच,
सुखी संसाराची गुरुकिल्ली असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7122
दैनिक झुंजार नेता
16नोव्हेंबर2019

अजेंड्याची कॉमनता

आजची वात्रटिका
------------------------------------------
अजेंड्याची कॉमनता
जिथे मसावी काढायला हवा,
तिथे लसावी काढला जातो.
अंकगणितात बीजगणित घालून,
समीकरणाचा तुकडा पाडला जातो.
खाली बुडखा नसला तरी,
वर मात्र सत्तेचा झेंडा असतो !
तोंड दाबून बुक्क्यांचा मार,
असा ' कॉमन अजेंडा ' असतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5627
दैनिक पुण्यनगरी
16नोव्हेंबर2019

Friday, November 15, 2019

किमान समान कार्यक्रम

आजची वात्रटिका
------------------------------------------
किमान समान कार्यक्रम
किमान समान कार्यक्रमात
सगळेच किमान असते.
जनता गेली उडत,
फक्त खुर्चीशी इमान असते.
काही करायचे म्हटले तर,
त्याला भलतीच लामन असते !
सरकार कुणाचेही असो,
सगळे काही कॉमन असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7121
दैनिक झुंजार नेता
15नोव्हेंबर2019

चिरंजीव लोकशाही

आजची वात्रटिका
-----------------------------------------
चिरंजीव लोकशाही
पुन्हा तेच बांधेकरी आहेत,
पुन्हा तेच वांधेकरी आहेत.
लोकशाहीची काढती प्रेतयात्रा,
पुन्हा तेच खांदेकरी आहेत.
लोकशाहीचा मुडदा पाडण्याची,
त्यांना खूप सवय झालेली आहे !
खांदेकरी सोकलेले असले तरी,
लोकशाही अमृत प्यालेली आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5626
दैनिक पुण्यनगरी
15नोव्हेंबर2019

Thursday, November 14, 2019

बालकांच्या पालकांसाठी....



आठवणीतील वात्रटिका
----------------------------------------
बालकांच्या
पालकांसाठी....
----------------------------------------
मुलं नसतात मातीचे गोळे,
तुम्हीही काही कुंभार नाही.
पारंपारिक दृष्टीकोनापुढे
तुम्हांला काही सुंबार नाही.
मुलातले व्यक्ति‘त्त्व उ‘लू द्या,
तुम्ही तुमचे डाव साधू नका.
आतले बाहेर येण्यापूर्वीच
वरतून काही लादू नका.
जसे झुलायचे तसे झुलू द्या,
जसे फुलायचे तसे फुलू द्या !
जिकडे दिसतो त्यांचा कल
खुशाल तिकडे कलू द्या !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-3831
दैनिक पुण्यनगरी
14नोव्हेंबर2014
----------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.

काय चेष्टा आहे?

आजची वात्रटिका
-----------------------------------------
काय चेष्टा आहे?
भाजपा अस्वस्थ आहे,
सेना अत्यावस्थ आहे.
काँग्रेसची ' हात ' घाई,
राष्ट्रवादी धरणग्रस्त आहे.
गडबड आहे,गोंधळ आहे,
अविश्वास हेच सार आहे.
ते पक्ष मात्र बिनधास्त,
ज्यांचा एक एक आमदार आहे.
धोक्यात महत्वाकांक्षा,
धोक्यात आज निष्ठा आहे !
बिनसा- बिनसी दिसली की,
ते म्हणतात, ही चेष्टा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5625
दैनिक पुण्यनगरी
14नोव्हेंबर2019

Wednesday, November 13, 2019

राष्ट्रपती राजवट


अंदरकी बात........


महा ब्रेकींग न्यूज

आजची वात्रटिका
-----------------------------------------
महा ब्रेकींग न्यूज
कुणासाठी राजकारण भिक्कार,
कुणासाठी राजकारण मक्कार आहे.
कुणासाठी ते बेक्कार तर,
कुणासाठी राजकारण टुक्कार आहे.
जेवढे राजकारण उथळ,
तेव्हढी मीडियाही उथळी आहे !
राजकारणापेक्षाही खालची,
टीव्ही चॅनेलवाल्यांची पातळी आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5624
दैनिक पुण्यनगरी
13नोव्हेंबर2019

Tuesday, November 12, 2019

मत मतांतर

आजची वात्रटिका
-----------------------------------------
मत - मतांतर
महाराष्ट्राचा सत्ता संघर्ष,
पुन्हा पुन्हा गोता खात आहे.
मतदारांनाही कळेना,
आपले मत कुठून कुठे जात आहे?
कालच्या मत - भेदाचे,
आज मत - मतांतर आहे !
यांना दिले काय?
त्यांना दिले काय ?
यात आता कुठे अंतर आहे ?
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5623
दैनिक पुण्यनगरी
12नोव्हेंबर2019

आचार संहितेची श्रध्दांजली


Monday, November 11, 2019

जनतेचा आवाज


रनिंग कॉमेन्ट्री

आजची वात्रटिका
--------------------------------------
रनिंग कॉमेन्ट्री
सत्तेच्या रिंगणाबाहेरचे,
रिंगणाच्या आत आले.
कालपर्यंत ' हात ' चोळणारे,
मनाचे मांडे खात आले.
तीन तिघाडे,काम बिघाडे,
मराठी माणसाला ज्ञात आहे.
विरोधी बाकावर बसण्याची,
यंदा नवीनच साथ आहे.
चाव्या मारून उपयोग नाही,
घड्याळाचीही टिक टिक आहे !
ब्रेकींग न्यूजचे मात्र,
जिकडे तिकडे पिकच पीक आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5622
दैनिक पुण्यनगरी
11नोव्हेंबर2019

Sunday, November 10, 2019

वॉल्मिकी रामायण

आजची वात्रटिका
--------------------------------------
वॉल्मिकी रामायण
फेसबुकच्या ' वॉल ' वर
प्रत्येकाने नियंत्रण ठेवले होते.
प्रत्येक ग्रुपच्या अॅडमिनने,
आपले कवाड लावले होते.
सोशल मीडियावर असे
' वॉल ' मिकी रामायण रंगले होते !
रंगाचा बेरंग होवू नये यासाठी,
जीव टांगणीला टांगले होते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7117
दैनिक झुंजार नेता
10नोव्हेंबर2019

विषारी डंख

आजची वात्रटिका
--------------------------------------
विषारी डंख
खपलीखालच्या जखमा,
कशा म्हणाव्या ओल्या नाहीत?
गावोगावी शाळांमध्ये,
पोरांना बसायला खोल्या नाहीत.
गल्लोगल्ली मद्यालये हाऊसफुल्ल,
रुग्णालयांच्या नावाने शंख आहेत !
विद्यालयांपेक्षा देवालयांना प्राधान्य,
नव्याने पुन्हा जुनेच डंख आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5621
दैनिक पुण्यनगरी
10नोव्हेंबर2019

Friday, November 8, 2019

महाराष्ट्राची वाटचाल

आजची वात्रटिका
--------------------------------------
महाराष्ट्राची वाटचाल
विश्वास आणि नैतिकतेची
सगळी लज्जत गेली आहे.
सगळ्याच भविष्यवाल्यांची
पुरती इज्जत गेली आहे.
चॅनलला बाईट देवून देवून
एकेकाचे तोंड सुजले आहे.
राजकीय विश्लेषकांचेही
पार टमरेल वाजले आहे.
ज्याला त्याला वाटतेय,
फक्त आपलीच लाल आहे !
महाराष्ट्र विधानसभेची
राष्ट्रतीपदाकडे वाटचाल आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7115
दैनिक झुंजार नेता
8नोव्हेंबर2019
------------------------------------------

रेड अलर्ट

आजची वात्रटिका
--------------------------------------
रेड अलर्ट
एक गोष्ट आम्हांला
पुराव्यानिशी पटली आहे.
कुत्र्यांना कुठे कळते?
लाल रंगाची बाटली आहे?
अंधश्रद्धा नष्ट करण्याचा
जणू कुत्र्यांचा चंग आहे !
त्याच्यावरच टांग वर करतात,
ज्यात नेमका लाल रंग आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5619
दैनिक पुण्यनगरी
8नोव्हेंबर2019

Thursday, November 7, 2019

आमचे ' मार्ग ' दर्शन

आजची वात्रटिका
--------------------------------------
आमचे ' मार्ग ' दर्शन
जसे आहेराचे कपडे बांधले की,
त्याचा बस्ता तयार होतो.
तसे खड्ड्याला खड्डे जोडले की,
त्याचा रस्ता तयार होतो
जी खड्ड्यांना खड्डे जोडते,
तिचे नावच नाली आहे !
खड्डे दिसत नाहीत त्या रस्त्यांची,
थेट गटारगंगा झाली आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7114
दैनिक झुंजार नेता
7नोव्हेंबर2019

हेल्मेट सक्तीचा धडा

आजची वात्रटिका
--------------------------------------
हेल्मेट सक्तीचा धडा
रस्त्यांवर खड्डे पडतात,
कारण रस्त्यांचा खाऊ केला जातो.
हेल्मेटची सक्ती केली तर,
त्याचाही खूपच बाऊ केला जातो.
आपली काळजी घेणाऱ्यांना,
आणि न घेणाऱ्यांना सुद्धा,
आपला उगीचच विरोध आहे !
हेल्मेट सक्ती वरून तरी,
सर्वांनी धडा घ्यावा असा बोध आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5618
दैनिक पुण्यनगरी
7नोव्हेंबर2019

Wednesday, November 6, 2019

काळजीस कारण की

आजची वात्रटिका
--------------------------------------
काळजीस कारण की,
एकमेकांच्या सहनशीलतेचा
जास्तच अंत पाहू लागले.
नव्या सरकारने सोडून,
जुनेच काळजी वाहू लागले.
काळजी निर्माण करणारेच,
राज्याची काळजी वाहत आहेत !
स्वतः बरोबर इतरांचीही,
निकालानंतर परीक्षा पाहत आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5617
दैनिक पुण्यनगरी
6नोव्हेंबर2019

नंबर गेम

आजची वात्रटिका
--------------------------------------
नंबर गेम
सर्वांचेच संख्याबळ
अगदी जेमतेम आहे.
सत्तास्थापना म्हणजे
पक्का 'नंबर गेम' आहे.
नंबर गेम म्हणजे
आकड्यांचा तिढा असतो !
जो सगळीकडेच वळवळतो,
तो सत्तेचा किडा असतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7113
दैनिक झुंजार नेता
6नोव्हेंबर2019

दैनिक वात्रटिका27एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -325वा

दैनिक वात्रटिका 27एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -325वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1NoornI--tmMB-ZAcXYuN3...