Friday, November 22, 2019

एकमत

आजची वात्रटिका
---------------------------------------
एकमत
ईव्हीएम शिवायसुद्धा
आपले मत कुणालाही जावू शकते.
ज्यांच्याकडे बहूमत नाही,
त्यांचेसुद्धा सरकार येवू शकते.
मतदानाचे मतांतर झाले
यावर आता काही दुमत नाही !
तुमच्या मताला विचारतो कोण?
त्यांचा सत्तेशिवाय जीव रमत नाही!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5633
दैनिक पुण्यनगरी
22नोव्हेंबर2019

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...