Wednesday, November 6, 2019

नंबर गेम

आजची वात्रटिका
--------------------------------------
नंबर गेम
सर्वांचेच संख्याबळ
अगदी जेमतेम आहे.
सत्तास्थापना म्हणजे
पक्का 'नंबर गेम' आहे.
नंबर गेम म्हणजे
आकड्यांचा तिढा असतो !
जो सगळीकडेच वळवळतो,
तो सत्तेचा किडा असतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7113
दैनिक झुंजार नेता
6नोव्हेंबर2019

No comments:

निषेध !

आजची वात्रटिका ---------------------- निषेध ! सांगताही येत नाही, कधी काळचा रोष आहे? 'मीटू मीटू' च्या वादळाला, राहून राहून जोश आहे. क...