Sunday, November 24, 2019

ऐतिहासिक सत्य

आजची वात्रटिका
-------------------------------------
ऐतिहासिक सत्य
कुणाला दुःख वाटू शकते,
कुणाला आनंद वाटू शकते.
पुतण्या कुणाचाही असो,
तो कधी ना कधी फुटू शकतो.
राजकीय सूडाबरोबरच
हा नात्यागोत्यावर डाका असतो !
जो पुतण्याला फोडतो,
तोही कुणाचा तरी काका असतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7129
दैनिक झुंजार नेता
24 नोव्हेंबर2019

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...