Friday, November 29, 2019

उद्धवशाही

आजची वात्रटिका
-------------------------------------
उद्धवशाही
हिंदुस्थानचा भारत झाला,
हे पटकन मार्क झाले.
कालपर्यंतचे शिवतीर्थ,
पुन्हा 'शिवाजी पार्क' झाले.
‌अनेकांना जय महाराष्ट्र करीत, ‍
सर्वसमावेशक रोल आहे.
आपलाच आपल्यावर
आता 'रिमोट कंट्रोल' आहे.
'मातोश्री'चे आशीर्वाद,
मराठी माणसाचे प्रेम,
खात्यावर जमा आहे !
किमान समान कार्यक्रम,
हाच आता 'वचननामा' आहे!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5640
दैनिक पुण्यनगरी
30नोव्हेंबर2019

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...