Wednesday, June 30, 2021

'शास्त्री'य सत्य


 आजची वात्रटिका

---------------------

'शास्त्री'य सत्य

दगड फेकून मारला की,
दगडाचेही मगअस्त्र होते.
अभ्यासक्रमात घातले की,
थोतांडचेही मग शास्त्र होते.

शास्त्र शास्त्र म्हणून,
थोतांड शिकविणे खरे नाही!
तर्काचा वितर्क करून,
कुडमुडे वाजविणे बरे नाही!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
फेरफटका-7634
दैनिक झुंजार नेता
30जून2021

राजी-नाराजी

आजची वात्रटिका
---------------------

राजी-नाराजी

इच्छा असो वा नसो,
हांजी हांजी करावी लागते.
थोडीफार नाराजी असली तरी,
अनिच्छेने राजी करावे लागते.

मनात असो वा नसो,
तरीही मनधरणी केली जाते !
सत्ता मोठी चालबाज,
तिच्याकडून करणी केली जाते!!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6191
दैनिक पुण्यनगरी
30जून2021

 

Tuesday, June 29, 2021

मोर्चेशाही

आजची वात्रटिका
---------------------

मोर्चेशाही

खालचे वेगळे आहेत,
वरचे वेगळे आहेत.
राज्य आणि केंद्राच्या विरोधात,
मोर्चे वेगळे आहेत.

मोर्चाच्या माध्यमातून,
डागण्यावर डागण्या आहेत!
फक्त आलटून-पालटून,
कालच्याच मागण्या आहेत!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7633
दैनिक झुंजार नेता
29जून2021

 

गर्जेल तो...…

आजची वात्रटिका
---------------------

गर्जेल तो...…

आधी म्हणाले,मी पुन्हा येईल,
मग म्हणाले,मी संन्यास घेईल.
राजकीय संन्यास घेतला तर,
पहिला संकल्प कसा पुरा होईल?

आत्मविश्वास की विसंगती?
हे ज्याला त्याला ज्ञात आहे!
ही बोलाचीच कढी ,
हा बोलाचाच भात आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6190
दैनिक पुण्यनगरी
29जून2021

 

Monday, June 28, 2021

बचेंगे तो....

आजची वात्रटिका
---------------------
बचेंगे तो....
यांनाही आणि त्यांनाही,
न सुटलेला तिढा आहे.
यांचाही आणि त्यांचाही,
जणू लुटूपुटूचा लढा आहे.
चिघळलेली आणि पघळलेली,
रिझर्व ठेवलेली लढाई आहे !
राजेहो, त्याची तर आता;
राज संन्यासाची बढाई आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
फेरफटका-7632
दैनिक झुंजार नेता
28जून2021

 

वाघोबाची सर्कस

आजची वात्रटिका
---------------------

वाघोबाची सर्कस

तीन तिघाडे असूनही,
जो-तो वरकस आहे.
टायमिंग साधता साधता,
वाघोबाची सर्कस आहे.

हातवारे आणि इशारे,
सहन करणे भाग आहे !
कुणी म्हणतो वाघोबाची सर्कस,
कुणी म्हणतो,
सर्कशीतला वाघ आहे!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6189
दैनिक पुण्यनगरी
28जून2021

 

Sunday, June 27, 2021

आली लहर.....

आजची वात्रटिका
---------------------
आली लहर.....
जिकडे बघावे तिकडे,
सर्वत्र चक्का जाम होता.
गोंधळलेला कोरोना मात्र,
अगदी पक्का जाम होता.
ज्याला जे पाहिजे,
ते खुशाल मागता यईल !
कोरोना पुटपुटला,
आता तिसऱ्यानंतर चौथीच्याही
तयारीला लागता येईल!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6188
दैनिक पुण्यनगरी
27जून2021

 

Saturday, June 26, 2021

कोरोनाच्या लाटा

आजची वात्रटिका
---------------------
कोरोनाच्या लाटा
पहिली गेली,दुसरी आली;
तिसरीलाही जोश आहे.
उण्याचा वाटेकरी म्हणून,
सोबत डेल्टा प्लस आहे.
कोरोना साधासुधा नव्हता,
आता तर फार बेकार आहे!
नव्या नव्या लाटाद्वारे,
कोरोनाची शिकार आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
फेरफटका-7630
दैनिक झुंजार नेता
26जून2021

 

छापा-काटा

आजची वात्रटिका
---------------------

छापा-काटा

संपत्तीवर छापा टाकून,
काटा काढणे सुरु आहे.
वर्मावर घाव घालून,
कंबरडे मोडणे सुरू आहे.

त्यांचाच छापा आहे,
त्यांचाच काटा आहे!
आरोप-प्रत्यारोपात,
राजकारणाचा वाटा आहे!!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6187
दैनिक पुण्यनगरी
26जून2021

 

ऐतिहासिक विकृती...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- ऐतिहासिक विकृती एकीकडे खोट्या इतिहासाशी, खऱ्या इतिहासाचे लढणे चालू आहे. दुसरीकडे विकृत इतिहासाच्या, व...