Monday, June 21, 2021

पत्रावळ

आजची वात्रटिका
---------------------

पत्रावळ

साहेब, जुळवून घ्या,
ही वैऱ्याची रात्र आहे आहे.
सैनिकाचे सेनापतीला,
अगदी कळवळून पत्र आहे.

पत्रावर पत्र बघून,
राजकीय चर्चा रंगत आहे!
आयत्या पत्रावळीवर तर,
विरोधकांची पंगत आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
फेरफटका-7625
दैनिक झुंजार नेता
21जून2021

 

No comments:

पोलखोल....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- पोलखोल समाजकारणातले राजकारण, हळूहळू उघडे पडायला लागले. ज्याला जिथे जिथे दडता येईल, ते तिथे तिथे ...