Wednesday, June 2, 2021

कोरोना आणि अर्थचक्र

आजची वात्रटिका
---------------------

कोरोना आणि अर्थचक्र

कुणाचे अर्थचक्र थांबलेले,
कुणाचे अर्थचक्र जोरात आहे.
भलीमोठी दरवाढ,
खाजगी रुग्णालयांच्या दरात आहे.

रुग्णालयांच्या वाढत्या अर्थचक्रात,
लोक पिळून निघत आहेत!
नाका-तोंडाला ऑक्सिजन लावूनही,
लोक पोळून निघत आहेत!!


-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6164
दैनिक पुण्यनगरी
2जून2021

 

No comments:

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...