Friday, June 4, 2021

तत्वत:मान्यता

आजची वात्रटिका
---------------------

तत्वत:मान्यता

मान्यता आणि तत्वत: मान्यता,
यात तत्वाचा फरक असतो.
उतावळ्या- बावळ्यांना,
हा मोठा फरक कुठे दिसातो?

ते तत्वत: मान्यातेलाच,
मान्यता मानून मोकळे होतात!
सर्वात आधी,सर्वात पुढे;
यात धन्यता मानून मोकळे होतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------
फेरफटका-7610
दैनिक झुंजार नेता
4जून2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 306 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका - मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव दैनिक आजचा अंक  दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 306 वा l पान...