Monday, June 7, 2021

नक्षत्रबाजी


आजची वात्रटिका
---------------------

नक्षत्रबाजी

पाऊस पावसाळ्यात येतो,
त्याला नक्षत्रांनी सजवून टाकतो.
पावसात भिजून झाले की,
त्याला नक्षत्रांनी उजवून टाकतो.

पावसाचे नक्षत्र सांगण्याची,
परंपरा काही आज नाही !
तुम्ही म्हणायचे ते म्हणा,
पाऊस मात्र नक्षत्रबाज नाही !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
चिमटा-6169
दैनिक पुण्यनगरी
7जून2021 

No comments:

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...