Monday, June 7, 2021

राजकीय सुरक्षितता

आजची वात्रटिका
---------------------

राजकीय सुरक्षितता

काही काही मुद्दे,
कायम आरक्षित आहेत.
आरक्षित मुद्द्यावरच,
अनेकजण सुरक्षित आहेत.

त्यांचा स्वार्थ यातच आहे,
त्यामुळे ते असे वागू शकतात!
मुद्दे निकाली निघाले तर,
तेही निकाली निघू शकतात!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7613
दैनिक झुंजार नेता
7जून2021

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...