Tuesday, June 1, 2021

भेट-गाठ

आजची वात्रटिका
---------------------
भेट-गाठ
तो तिला भेटला,
ती त्याला भेटली.
दोघांच्या सदिच्छा भेटीची,
जोरदार आवई उठली.
सदिच्छा भेटीची,
कसलीच लपाछपी नाही!
कुणाचीही भेट,
दिसते तेवढी सोपी नाही!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7608
दैनिक झुंजार नेता
1जून2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...