Friday, June 11, 2021

शाब्दिक खेळ

आजची वात्रटिका
---------------------

शाब्दिक खेळ

सतत शब्द टाळले जातात,
कधी कधी शब्द पाळले जातात.
घोळात घोळ घालून,
कधी कधी शब्द घोळले जातात.

टाळी-टाळी, घोळा-घोळी;
यावरच दिवस ढकलले जातात!
शाब्दिक खेळ कळले तरच,
सगळे पैलू उकलले जातात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
चिमटा-6173
दैनिक पुण्यनगरी
11जून2021

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...