Thursday, June 3, 2021

हौसराव जिंदाबाद!

आजची वात्रटिका
---------------------

हौसराव जिंदाबाद!

वाढदिवसाच्या बॅनर वर,
फोटोंची गर्दी असते.
इकडची गर्दी तिकडे,
तिकडची इकडे गर्दी दिसते.

फोटोंच्या गर्दीमध्ये,
आपली निष्ठा मिरवली जातो!
नेत्यांबरोबर स्वतःचीही हौस,
स्वखर्चाने पुरवली जाते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7609
दैनिक झुंजार नेता
3जून2021

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...