Friday, June 4, 2021

लॉक अनलॉक

आजची वात्रटिका
---------------------

लॉक अनलॉक

लॉक अनलॉकच्या वृत्ताचा
नुसता गोंधळत गोंधळ आहे.
समज आणि गैरसमजांचा,
नुसता पुरावर पूर वाहे.

वरून लॉक,आतून अनलॉक,
लोकांचाही शॉक आहे !
ज्याने ज्याने भोगले,
त्यालाच कोरोनाचा धाक आहे!!


-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
चिमटा-6166
दैनिक पुण्यनगरी
4जून2021

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...