Sunday, June 13, 2021

संयुक्त सरकार

आजची वात्रटिका
---------------------
संयुक्त सरकार
राजकारणाचा काही नेम नाही,
कुणीही कुणाचा हात धरू शकतात.
भविष्यात सर्व पक्ष मिळून,
सरकार स्थापन करू शकतात.
कितीही मतभेद असले तरी,
हा सत्तांधाचा जत्था आहे !
शेवटी सर्वांचा कॉमन अजेंडा,
फक्त सत्ता आणि सत्ता आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------
फेरफटका-7619
दैनिक झुंजार नेता
13जून2021

 

No comments:

भक्त सलामत तो...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- भक्त सलामत तो... किती भोंदू बाबा आले गेले, ज्यांचे भांडे सतत फुटले आहे. भोंदू हे भोंदूच असतात, अ...