Tuesday, June 1, 2021

आजची वात्रटिका
---------------------

सदिच्छा भेट

त्यांच्या सदिच्छा भेटीचे,
वाट्टेल ते अर्थ निघू शकतात.
सोयीचा चश्मा लावून,
लोक त्याकडे बघू शकतात.

एका सदिच्छा भेटीचा,
राजकीय गाजावाजा आहे !
एक पेशवा असेल तर,
दुसरा जाणता राजा आहे!!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6163
दैनिक पुण्यनगरी
1जून2021

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...