Friday, June 18, 2021

चोर आणि घोर

आजची वात्रटिका
---------------------

चोर आणि घोर

अनिष्ट प्रवृत्ती असल्या तरी,
कुठे जास्त,कुठे थोड्या आहेत.
पोलिसांकडून पोलिसांनाच,
आज-काल बेड्या आहेत.

त्यामध्ये आपला काय गुन्हा?
आपल्याला उगीच घोर असतो!
चोर म्हणाले चोरांना,
पकडले तरच आपण चोर असतो!!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6179
दैनिक पुण्यनगरी
18जून2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 301वा l पाने -54

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 301वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1S4SAD0tMR_eqzmeUqaS...