Thursday, June 24, 2021

अपप्रचार

आजची वात्रटिका
---------------------

अपप्रचार

कोरोना एवढाच लसीच्या,
अपप्रचाराचा प्रसार होतो आहे.
जो अपप्रचाराने झपाटला.
तो लसीकरणाला नकार देतो आहे.

उद्या वाईट वेळ आली तर,
मूर्खपणावर रडू नका !
कोरोनाच्या अगोदर,
अपप्रचाराला बळी पडू नका !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------
फेरफटका-7628
दैनिक झुंजार नेता
24जून2021

No comments:

daily vatratika...29jane2026