Tuesday, June 22, 2021

बहुरूपी कोरोना

आजची वात्रटिका
---------------------

बहुरूपी कोरोना

कोरोना जसा बहुरंगी आहे,
तसा कोरोना बहुढंगी आहे.
कुणासाठी आयते घबाड,
कुणासाठी गाजराची पुंगी आहे.

लाटेमागून लाट येतेय,
कोरोना नक्की लहरी आहे!
ज्याला बाधले तो सांगेल,
कोरोना अत्यंत जहरी आहे!!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7626
दैनिक झुंजार नेता
22जून2021

 

No comments:

daily vatratika...29jane2026