Wednesday, June 9, 2021

चॅनल-पॅनल


 आजची वात्रटिका

---------------------

चॅनल-पॅनल

साध्या साध्या गोष्टींचाही,
उगीच किस पाडला जातो.
इतरांना फुटला नाही तरी,
स्वतःचाच घाम काढला जातो.

एकमेकांची नक्कल करतात,
त्यात काही शक्कल नसते !
गरजवंत कुठले असोत,
त्यांना फार अक्कल नसते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
फेरफटका-7615
दैनिक झुंजार नेता
9जून2021

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...