Saturday, June 12, 2021

लट्टू आणि तट्टू

आजची वात्रटिका
---------------------

लट्टू आणि तट्टू

कुणी वशिल्याचे तट्टू असतात,
कुणी लाचारीवर लट्टू असतात.
ज्यांना काही जमत नाही,
त्यांच्यावरती खट्टू असतात.

लट्टू आणि तट्टू यांना,
गॉडफादर पोशीत असतात!
जनता सोसायचे ते सोसते,
लट्टू - तट्टू खुशीत असतात !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7618
दैनिक झुंजार नेता
12जून2021

 

No comments:

daily vatratika...29jane2026