Friday, January 31, 2020

सरकारी पुरस्कार


व्हायरस इन्फेक्शन

आजची वात्रटिका
----------------------------------------
व्हायरस इन्फेक्शन
व्हायरसवर व्हायरसची,
वरचेवर भर आहे.
जात,धर्म,भाषा,प्रांतांच्या,
व्हायरसला कुठे मर आहे?
व्हायरसच्या इन्फेक्शनचे
परिणाम खूप दाहक आहेत.
मोठा धोका असा की,
माणसेच त्यांचे वाहक आहेत.
द्वेषवर्धक व्हायरसपासून,
माणुसकी वाचली पाहिजे !
जेंव्हा आणि जिथे टोचता येईल,
तिथे प्रेमाची लस टोचली पाहिजे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5699
दैनिक पुण्यनगरी
31जानेवारी 2020

Thursday, January 30, 2020

राजे,चला तुम्हांला तुमचा महाराष्ट्र दाखवतो


गांधीबाबा



आजची वात्रटिका
----------------------------------------
गांधीबाबा
राष्ट्रपिता म्हणून
जशी तुमची कीर्ती आहे.
तसे तुमचे नाव,
मजबूरीशी समानार्थी आहे.
अहिंसेच्या लढ्याला,
सत्याग्रहाचा पाया आहे !
ज्यांना तुम्ही दुर्बल वाटता,
त्यांची खरोखर दया आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7192
दैनिक झुंजार नेता
30जानेवारी2020
----------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.

विषबाधा

आजची वात्रटिका
----------------------------------------
विषबाधा
कुठली तरी भूल देऊन,
लोकांना भुलवले जाते.
लोकांच्या मनामध्ये
विष कालवले जाते.
त्यांच्या विषबाधेने,
लोकही बाधले जातात !
लोक शुद्धीवर येईपर्यंत
त्यांचे डाव साधले जातात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5698
दैनिक पुण्यनगरी
30जानेवारी 2020

Wednesday, January 29, 2020

शेम टू शेम

आजची वात्रटिका
----------------------------------------
शेम टू शेम
उलट सुलट भूमिका,
सारख्या सारख्या घेऊ लागले.
एकमेकांच्या फिरक्या घेणारे,
आता गिरक्या घेऊ लागले.
फिर फिर फिरक्या आहेत,
गिर गिर गिरक्या आहेत !
सगळ्यांच्या तऱ्हासुद्धा
सारख्याला वारख्या आहेत!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7191
दैनिक झुंजार नेता
29जानेवारी2020
----------------------------------------

चाय पे चर्चा

आजची वात्रटिका
----------------------------------------
शेम टू शेम
उलट सुलट भूमिका,
सारख्या सारख्या घेऊ लागले.
एकमेकांच्या फिरक्या घेणारे,
आता गिरक्या घेऊ लागले.
फिर फिर फिरक्या आहेत,
गिर गिर गिरक्या आहेत !
सगळ्यांच्या तऱ्हासुद्धा
सारख्याला वारख्या आहेत!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7191
दैनिक झुंजार नेता
29जानेवारी2020

Tuesday, January 28, 2020

जय संतोषी माता

आजची वात्रटिका
----------------------------------------
जय संतोषी माता
पोस्टकार्डवरची संतोषीमाता,
सोशल मीडियावर आली.
सोळा शुक्रवारची कहाणी,
मोबाईलवरून व्हायरल झाली.
जुन्याच जळमटांना,
नव्या तंत्रज्ञाची पॉलिश आहे !
कॉपी-पेस्ट आणि फॉरवर्डचा,
खेळच अगदी बालीश आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269

तान्हाजी:द अनसंग वॉरिअर

आजची वात्रटिका
----------------------------------------
तान्हाजी:द अनसंग वॉरिअर
एक होता हिरो,
त्याचा 'सुपर हिरो' झाला.
चित्रपटापुढे इतिहास,
अगदीच झिरो झाला.
शेलारमामा आणि सूर्याजी,
यांचा तर पुरता मामा आहे.
धंद्यापुढे वास्तवसुद्धा,
पुरते इतिहासजमा आहे.
इतिहासाला वैधानिक इशारा,
पुन्हा पुन्हा छळत आहे !
"पैसा आला पण इतिहास गेला"
उदेभान हळहळत आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5697
दैनिक पुण्यनगरी
28जानेवारी 2020

Sunday, January 26, 2020

नकारातला सकार

आजची वात्रटिका
----------------------------------------
नकारातला सकार
जी गत पूर्वी होती,
तीच गत आत्ता आहे.
मूठभर लोकांचीच,
प्रजेवर सत्ता आहे.
मूठभर लोकांचीच,
पुन्हा पुन्हा मजा आहे.
लोकांच्या अविचाराची,
लोकांनाच सजा आहे.
अविचाराला मूठमाती,
विचाराला चालना हवी !
नकारात्मक नकोच नको,
सकारात्मक तुलना हवी !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7189
दैनिक झुंजार नेता
26जानेवारी2020

प्रजेचे राज्य आले

आजची वात्रटिका
----------------------------------------
प्रजेचे राज्य आले
गोरे इंग्रज गेले,
काळे लुटायला सज्ज झाले,
पुरते लुटले गेले तरी म्हणा,
प्रजेचे राज्य आले.
हक्काच्या गदारोळात
कर्तव्य त्याज्य झाले.
गुंडपुंड पूज्य झाले तरी म्हणा,
प्रजेचे राज्य आले.
संधीसाठी टपलेले
जाळे लावून सज्ज झाले.
संधीसाधू मातळले तरी म्हणा,
प्रजेचे राज्य आले.
खादीवाल्यांचे खादाडपण,
अगदीच अविभाज्य झाले.
त्यांच्या ढेकरासोबत म्हणा,
प्रजेचे राज्य आले.
वाईट दशा,तरीही आशा,
तेच वकील,तेच जज्ज झाले !
पुढच्या पिढीसाठी तरी म्हणा,
प्रजेचे राज्य आले !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5696
दैनिक पुण्यनगरी
26जानेवारी 2020

Saturday, January 25, 2020

व्यक्तीशाही

आजची वात्रटिका
----------------------------------------
व्यक्तीशाही
सगळ्या जुन्या गोष्टी,
हळुहळू खोट्या झाल्या.
पक्ष झाले छोटे,
व्यक्ती मात्र मोठ्या झाल्या .
पक्षापेक्षा नेते मोठे,
ही छोटीशी बाब नाही !
तिथे कोण थांबतो ?
जिथे राजकीय लाभ नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7188
दैनिक झुंजार नेता
25जानेवारी2020

फोन टॅपिंग

आजची वात्रटिका
-----------------------------------------
फोन टॅपिंग
नवरा बायकोकडून एकमेकांचा
रोजच्या रोज मोबाईल टॅप आहे.
दोघेही एकमेकांना बजावतात,
हे तर अघोरी पाप आहे .
टॅपिस्ट आणि पापिस्टांची
खरोखरच धन्य आहे !
असे कुणी दिसले तर त्यांना सांगा,
नेमके कोणते पुण्य आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5695
दैनिक पुण्यनगरी
25जानेवारी 2020

Friday, January 24, 2020

सामुदायिक दुःख

आजची वात्रटिका
-----------------------------------------
सामुदायिक दुःख
आपल्याला घराणेशाही वाटते,
त्यांना तो वारसा वाटतो आहे.
एकाच माळेच्या मण्यांत,
फरक कुठे फारसा वाटतो आहे?
आपण ज्याला घराणेशाही म्हणतो,
त्यांच्यासाठी तो पारंपरिक हक्क आहे !
आपण समजूनच घेत नाही,
हे त्यांचे सामुदायिक दुःख आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7187
दैनिक झुंजार नेता
24जानेवारी2020

राज-मुद्रा

आजची वात्रटिका
-----------------------------------------
राज-मुद्रा
मनसेच्या नव्या झेंड्यावरती,
शिवरायांची राज-मुद्रा आहे.
बदलत्या भूमिका बघून,
चांगल्या चांगल्याला हादरा आहे?
घराणेशाहीला विरोध करणारा,
घराणेशाही पाळीत आहे !
आणखी एक नवा ठाकरे,
महाराष्ट्राच्या झोळीत आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5694
दैनिक पुण्यनगरी
24जानेवारी 2020

Thursday, January 23, 2020

सावधान

आजची वात्रटिका
-----------------------------------------
सावधान
आजकाल भिंतीला कानच नाही,
तर चक्क डोळे असतात.
त्याची बोंबाबोंब होतेच
जरी तोंडात बोळे असतात.
त्यामुळेच आपले असले तरी,
ते मांडीआड करून खाल्ले पाहिजे !
योग्य काय?अयोग्य काय?
हे वेळोवेळी तोलले पाहिजे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7186
दैनिक झुंजार नेता
23जानेवारी2020

बुडत्याचा पाय

आजची वात्रटिका
-----------------------------------------
बुडत्याचा पाय
दुसऱ्यास सल्ले देणारांना,
खरोखरच काही कळतेय काय?
याचा कुठे पत्ता आहे,
आपल्या बुडाखाली जळतेय काय?
दुसऱ्याचा धूर दिसतो,
आपला कुटाणा ज्वालात असतो !
कोणत्याही बुडत्याचा पाय,
नेहमीच खोलात असतो !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5693
दैनिक पुण्यनगरी
23जानेवारी 2020

Tuesday, January 21, 2020

भक्तीचा भावार्थ

आजची वात्रटिका
-----------------------------------------
भक्तीचा भावार्थ
जसजसे देव आणि धर्म,
जास्तच घाऊक होतात.
तसतसे भक्तलोक,
जास्तच भावूक होतात.
पूजेपेक्षा पोटपूजेपोटी
भक्त जास्तच भावूक होतात !
भक्तांचे सगळे भाव,
न सांगताही ठाऊक होतात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7184
दैनिक झुंजार नेता
21जानेवारी2020

एका आघाडीची बिघाडी

आजची वात्रटिका
-----------------------------------------
एका आघाडीची बिघाडी
लक्ष्मणाने रेषा ओलांडली,
आता तर आनंदी'आनंद' आहे.
आघाडीतून बहुजन वंचित होणे,
अद्यापही कुठे पूर्ण बंद आहे ?
आघाडीतल्या वंचितांचा,
बंधु-भाव खात्रीने वाढायला हवा !
आता नाहीतर पुन्हा नाही,
हा 'प्रकाश' डोक्यात पडायला हवा !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5691
दैनिक पुण्यनगरी
21जानेवारी 2020

Monday, January 20, 2020

नो ऑप्शन !

आजची वात्रटिका
-----------------------------------------
नो ऑप्शन !
ज्याला सांगुनही कळत नाही,
तो तर पार खुळा आहे.
भारतीय लोकशाहीला,
घराणेशाहीचा लळा आहे.
लोकशाही रुजवत असताना,
घराणेशाही माजली आहे !
मर्यादीत पर्यायामुळेच
घराणेशाही रुजली आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7183
दैनिक झुंजार नेता
20जानेवारी2020

मार्केटिंग प्रसन्न

आजची वात्रटिका
-----------------------------------------
मार्केटिंग प्रसन्न
मी मोठा की तू मोठा?
भक्ता-भक्तात चढाई असते.
माझी मोठी की तुझी मोठी?
शक्ती-भक्तीची लढाई असते.
जेंव्हा भाविकांच्या भक्तीचा
खूप मोठा धंदा होऊ लागतो !
तेंव्हा तर डोळे असूनही,
भक्त अंधा होऊ लागतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5690
दैनिक पुण्यनगरी
20जानेवारी 2020

Sunday, January 19, 2020

श्रद्धा आणि सबुरी

आजची वात्रटिका
-----------------------------------------
श्रद्धा आणि सबुरी
देव-धर्मावरून भांडण्याचा,
आपल्याला जुनाच नाद आहे.
रामजन्मभूमीनंतर आता,
साई जन्मभूमीचा वाद आहे.
म्हणे कर्मभूमी शिर्डी असून,
साई जन्मभूमी पाथरीत आहे !
'सबका मालिक एक है'
सांगणाराच वादाच्या कात्रीत आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7182
दैनिक झुंजार नेता
19जानेवारी2020

सत्कारसंहिता

आजची वात्रटिका
-----------------------------------------
सत्कारसंहिता
नालायकांच्या हातूनच
लायकांचे गौरव होतात.
पांडवांची मजबुरी बघून,
आंनदीत कौरव होतात.
लायकांच्या हातूनच,
लायक सत्कारले पाहिजेत !
नालायकांकडून होणारे गौरव
लायकांनी धुत्कारले पाहिजेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5689
दैनिक पुण्यनगरी
19जानेवारी 2020

Saturday, January 18, 2020

'राज'कीय बदल

आजची वात्रटिका
-----------------------------------------
'राज'कीय बदल
ज्यांना ओळखता येईल,
त्यांच्यासाठी हिंट आहे.
नवनिर्माण करताना,
गुंडाळलेली 'ब्ल्यू प्रिंट'आहे.
बदलत्या झेंड्याचे,
हेच तर मर्म आहे !
सेनापतीच्या अजेंड्यावर
महाराष्ट्र धर्म आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7181
दैनिक झुंजार नेता
18जानेवारी2020

त्रिसूत्री कार्यक्रम

आजची वात्रटिका
-----------------------------------------
त्रिसूत्री कार्यक्रम
एक नाही,दोन नाही,
तिघांच्या तीन दिशा आहेत.
तरीसुद्धा स्थिरतेच्या,
तिघांनाही आशा आहेत.
कधी आतून,कधी बाहेरून,
एकमेकांना चेक आहे !
श्रद्धा आणि सबुरीचे कारण,
सबका मालिक एक आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5688
दैनिक पुण्यनगरी
18जानेवारी 2020

Friday, January 17, 2020

विक्रमी खादयोत्सव

आजची वात्रटिका
-----------------------------------------
विक्रमी खादयोत्सव
कुणी?किती?काय खावे?
याचा नेम उरला नाही.
नदी,नाल्या,मैल्यापर्यंत,
कोणताच माल पुरला नाही.
एक एक खाणारा असा की,
जणू पट्टीचा वाघ आहे !
त्यांनी खाल्यावर कळते,
कोणता पदार्थ किती महाग आहे ?
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7180
दैनिक झुंजार नेता
17जानेवारी2020

संजूबाबा

आजची वात्रटिका
-----------------------------------------
संजूबाबा
अंडरवर्ल्डच्या संबंधावरून
जिकडे तिकडे जाळ आहे.
कुणी उठवतोय राळ तर,
कुणाच्या पायात दगडी चाळ आहे.
अंडरवर्ल्डच्या पोलखोलीमुळे
कुणी चावळू,कुणी बावळू लागले !
अंडरवर्ल्डच्या आठवणीमुळे,
अख्खे राजकारण ढवळू लागले !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5687
दैनिक पुण्यनगरी
17जानेवारी 2020

Thursday, January 16, 2020

बोलंदाजी

आजची वात्रटिका
-----------------------------------------
बोलंदाजी
बोलाचीच कढी अन,
बोलाचाच भात आहे.
मिटक्या मारीत जो तो,
मोठ्या चवीने खात आहे.
बोलाबोली,वादविवाद,
याचे उदाहरणं बोलके आहेत !
कुणी वाजवतो तुणतुणे,
कुणी पट्टीचे ढोलके आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7179
दैनिक झुंजार नेता
16जानेवारी2020

जखमी इतिहास

आजची वात्रटिका
-----------------------------------------
जखमी इतिहास
जुनाच मुद्दा नव्याने,
कुणी तरी उगळू लागतो.
जखमा ओल्या होऊन,
इतिहास पुन्हा चिघळू लागतो.
चढायावर चढाया होतात,
बढायावर बढाया होतात !
तहाच्या अटी ठरवूनच,
लढायावर लढाया होतात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5686
दैनिक पुण्यनगरी
16जानेवारी 2020

Wednesday, January 15, 2020

सत्तांतर

आजची वात्रटिका
-----------------------------------------
सत्तांतर
कोणतेही सत्तांतर म्हणजे
त्यांचीच आळीपाळी असते.
सामान्य जनता चोळते हात,
त्यांची टाळीवर टाळी असते.
विरोधातले खुर्चीवर,
खुर्चीवरचे विरोधात बसतात !
जगातली सगळी सत्तांतरे,
अगदी अशीच तर असतात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7178
दैनिक झुंजार नेता
15जानेवारी2020

हळद म्हणाली कुंकवाला

आजची वात्रटिका
-----------------------------------------
हळद म्हणाली कुंकवाला
तुझ्या माझ्या कार्यक्रमात
आया-बहिणींचा अपमान नको.
जखमेवर मीठ चोळले जाईल,
असे संक्रांतीचे वाण नको.
पंरपरा जुन्या असल्या तरी,
त्याला नवा साज देऊ या !
काळ वेगाने बदलतो आहे,
आपणही अपडेट होऊ या !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5685
दैनिक पुण्यनगरी
15जानेवारी 2020

Monday, January 13, 2020

कवी कट्टा

आजची वात्रटिका
-----------------------------------------
कवी कट्टा
काव्यवाचनाची संधी म्हणजे
कवीला लागलेला सट्टा असतो.
नवकवींची सोय म्हणजे,
संमेलनातला कवीकट्टा असतो.
पदरखर्चाने नवकवी,
झटपट फिरवून घेतात !
म्हातारचळ म्हणून म्हातारेही
कट्टयावर मिरवून घेतात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7176
दैनिक झुंजार नेता
13जानेवारी2020

बोलघेवडे

आजची वात्रटिका
-----------------------------------------
बोलघेवडे
विषयांची केवळ चिवडाचिवड,
सारे केवळ चिवडे आहेत.
कितीही खमंग वाटले तरी,
ते निव्वळ बोलघेवडे आहेत.
जिकडे तिकडे बोलघेवड्यांचाच,
नको तितका बोलबाला आहे !
प्रबोधन राहिले बाजूला,
प्रबोधनाचा बाजार झाला आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5683
दैनिक पुण्यनगरी
13जानेवारी 2020

Sunday, January 12, 2020

साहित्यिक दुमत

आजची वात्रटिका
-----------------------------------------
साहित्यिक दुमत
ही काही 'मन की बात' नाही,
ही काही फेकाफेकी नाही.
हिटलरशाहीच्या मुद्द्यावर,
साहित्यिकात एकी नाही.
प्रश्न हा नाही की?
कुणी ऑदर वा फादर आहे !
ज्याच्या त्याच्या दृष्टीकोनाचा,
आम्हांलाही आदर आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7175
दैनिक झुंजार नेता
12जानेवारी2020
---------------------------------------

उपवास

आजची वात्रटिका
-----------------------------------------
उपवास
कधी यांचे उपाशी असतात,
कधी त्यांचे उपाशी असतात.
हाती येते सत्ता तेंव्हा,
कार्यकर्ते तुपाशी असतात.
तुमच्या आमच्या आयुष्यात,
मग फरक काय पडत असतो ?
कुणी कुणी आपला उपवास,
बॅकलॉगसहीत सोडत असतो !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5682
दैनिक पुण्यनगरी
12जानेवारी 2020
------------------------------------

Friday, January 10, 2020

शाप आणि उ:शाप

आजची वात्रटिका-
-----------------------------------------
शाप आणि उ:शाप
वाद रोखता रोखता
संयोजकांना धाप आहे.
मराठी साहित्य संमेलनाला
वादाचा शाप आहे.
वादाबरोबर संवाद व्हावा,
नव्यांच्या पाठीवर थाप पाहिजे !
वैचारिक परिघ विस्तारून
शापाला उ:शाप पाहिजे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5680
दैनिक पुण्यनगरी
10जानेवारी 2020

Thursday, January 9, 2020

पिढीजात सत्य

पिढीजात सत्य
त्यांच्याच दारी तोरणं,
त्यांच्याच दारी गुढ्या आहेत.
सत्तेत तेच आहेत,
सत्तेवर त्यांचाच पिढ्या आहेत.
आपल्या लोकशाहीचे
हे पिढीजात सत्य आहे !
अधूनमधून नाहीतर,
हा कार्यक्रम नित्य आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7173
दैनिक झुंजार नेता
9जानेवारी2020

अदला-बदली

आजची वात्रटिका
-----------------------------------------
अदला-बदली
कुणी बदलले दांडे,
कुणी झेंडे बदलू लागले.
कुणी बदलल्या टोप्या,
कुणी गोंडे बदलू लागले.
रंग बदलणे हा तर,
राजकीय स्वभाव आहे !
कुंपणाच्याही पलिकडे,
हल्ली सरड्यांची धाव आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5680
दैनिक पुण्यनगरी
9जानेवारी 2020

Wednesday, January 8, 2020

सामाजिक वचक



आजची वात्रटिका
-----------------------------------------
सामाजिक वचक
कुणाला जन्मठेप आहे,
कुणाला फाशी आहे.
पिडितांना न्याय मिळाला,
पण पुन्हा तीच काशी आहे.
फाशीपेक्षा अजून कोणती
शिक्षा जाचक पाहिजे ?
गुन्हेगारांवर कायद्यासोबत,
सामाजिक वचक पाहिजे !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5679
दैनिक पुण्यनगरी
8जानेवारी 2020
---------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.

संजय उवाच

आजची वात्रटिका
-----------------------------------------
संजय उवाच
राऊत आपले घोडे,
पुन्हा नव्याने दामटू लागले.
आपले उधळलेले घोडे,
राष्ट्रपतीपदाकडे रेमटू लागले.
ठाकरे झाले मुख्यमंत्री,
आता पवारांसाठी शिष्टाई आहे !
घोडा मैदान दूर असूनही,
संजयाची दिव्य दृष्टाई आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7172
दैनिक झुंजार नेता
8जानेवारी2020

Tuesday, January 7, 2020

हौस 'फुल' कार्यक्रम

आजची वात्रटिका
-----------------------------------------
हौस 'फुल' कार्यक्रम
फसवा-फसवी जिंदाबाद,
हे ठसवून घेतले जात आहे.
इतरांकडून स्वतःला,
फसवून घेतले जात आहे.
फसवा-फसवीचे खेळ,
इथे ऐन रंगात आहेत !
फसवाफसवीचे कार्यक्रम
नव-नव्या ढंगात आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7171
दैनिक झुंजार नेता
7जानेवारी2020

गौरव सोहळे

आजची वात्रटिका
-----------------------------------------
गौरव सोहळे
कालची जुनी लढाई,
पांडव विरुद्ध कौरव आहे.
आज मात्र दोघांकडून,
एकमेकांचा गौरव आहे.
पांडवांची मजबुरी,
कौरवांच्या गाली खळी आहे !
आंधळ्या धृतराष्ट्रांची पुन्हा,
अळीमिळी गुपचिळी आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5679
दैनिक पुण्यनगरी
7जानेवारी 2020

Monday, January 6, 2020

खाते वाटप

आजची वात्रटिका
-----------------------------------------
खाते वाटप
खातेवाटपाचे गुऱ्हाळ
समजून घेण्यासारखे असते.
ज्या खात्याचा आग्रह होतो,
तिथे जास्त खाण्यासारखे असते.
खातेवाटपाच्या घोळामुळे,
हा समज-गैरसमज ठाम आहे !
तुमचे कर्तृत्व कामाचे नाही,
कामापेक्षाही मोठा दाम आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7170
दैनिक झुंजार नेता
6जानेवारी2020

सूत्र नव्हे मित्र !

आजची वात्रटिका
-----------------------------------------
सूत्र नव्हे मित्र !
मनानेच पेरतात बातमी,
ठरवून तिचा बभ्रा असतो.
सूत्र नावाचा मित्र,
भलताच चाभरा असतो.
'न्यूज व्हॅल्यू' चा निकष,
फक्त नावाला असतो.
कोणत्याही 'बिग न्यूज'ला
खास सूत्रांचा हवाला असतो.
ही सूत्र साधी नाहीत,
ती तर 'कळ'सूत्रं आहेत !
फक्त मालकशहांचे,
ते स्मार्ट मित्र आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5678
दैनिक पुण्यनगरी

दैनिक वात्रटिका19मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -286वा

दैनिक वात्रटिका 19मार्च2024....वर्ष- तिसरे.. अंक -286वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1-fbx6QEScldHj2QiABT650...