Sunday, January 26, 2020

प्रजेचे राज्य आले

आजची वात्रटिका
----------------------------------------
प्रजेचे राज्य आले
गोरे इंग्रज गेले,
काळे लुटायला सज्ज झाले,
पुरते लुटले गेले तरी म्हणा,
प्रजेचे राज्य आले.
हक्काच्या गदारोळात
कर्तव्य त्याज्य झाले.
गुंडपुंड पूज्य झाले तरी म्हणा,
प्रजेचे राज्य आले.
संधीसाठी टपलेले
जाळे लावून सज्ज झाले.
संधीसाधू मातळले तरी म्हणा,
प्रजेचे राज्य आले.
खादीवाल्यांचे खादाडपण,
अगदीच अविभाज्य झाले.
त्यांच्या ढेकरासोबत म्हणा,
प्रजेचे राज्य आले.
वाईट दशा,तरीही आशा,
तेच वकील,तेच जज्ज झाले !
पुढच्या पिढीसाठी तरी म्हणा,
प्रजेचे राज्य आले !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5696
दैनिक पुण्यनगरी
26जानेवारी 2020

No comments:

शेतकऱ्यांची लढाई

आजची वात्रटिका ----------------------- शेतकऱ्यांची लढाई आम्हीच शेकऱ्यांचे पाठीराखे, केवळ बढायावर बढाया आहेत. अनेक आघाड्यांवरती, शेतकऱ्यांच्...