Friday, May 31, 2019

मंत्रीमंडळ स्थापना

आ।ज।ची।वा।त्र।टि।का
--------------------------------
मंत्रीमंडळ स्थापना
मंत्रीमंडळ कुणाचेही असो,
त्यात समतोल साधावा लागतो.
सर्वांचे समाधान होईल,
असा तोडगा शोधावा लागतो.
एवढे सारे करूनसुद्धा
कुठे गम,कुठे खुशी असते !
जनतेचा विचार करतो कोण?
ती तर जशी आहे तशी असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-6963
दैनिक झुंजार नेता
31मे2019
--------------------------------------
------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे

वैचारिक विकार

आ।ज।ची।वा।त्र।टि।का
--------------------------------
वैचारिक विकार
जसा नकाराला नकार आहे,
तसा सकारालाही नकार आहे.
दुसरे तिसरे काहीच नाही,
हा तर वैचारिक विकार आहे.
नकारात्मकांचा सकारात्मकतेशी
अवैचारिक असा तंटा आहे !
विचारात सतत नकारात्मकता,
आणि हातात काय?तर घंटा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5464
दैनिक पुण्यनगरी
31मे2019
------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com/

Thursday, May 30, 2019

चांगभलं

आ।ज।ची।वा।त्र।टि।का
--------------------------------
चांगभलं
जिकडे सत्ता, तिकडे आवक,
जिकडे वारे,तिकडे सारे आहेत.
आज बदलल्या त्यांच्या घोषणा,
आज बदललेले त्यांचे नारे आहेत.
ज्याची इच्छा, त्याचा पिच्छा,
आम्ही कुणाला नावे ठेवीत नाहीत!
तरी बरे अजून कोणत्याही पक्षात,
हाऊस फुल्ल चा बोर्ड लावीत नाहीत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-6962
दैनिक झुंजार नेता
30मे2019
------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
माझ्या ग्रुप मध्ये सहभागी व्हायचे असेल तर मला असा
Add me असा
Whatsapp मेसेज करा.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com/

फॅमिली प्लॅनिंग

आ।ज।ची।वा।त्र।टि।का
--------------------------------
फॅमिली प्लॅनिंग
नवरा एकीकडे,बायको दुसरीकडे,
पोरगा तिसरीकडे,सून चौथीकडे आहे.
पाचवीकडे लेक, सहावीकडे जावई,
तर अपक्षपद सवतीकडे आहे.
इकडे तिकडे बघत बसू नका,
कदाचित उद्या असेही घडू शकते !
सरकार कुणाचेही आले तरी,
घराण्याचे कुठे काय अडू शकते ?
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5463
दैनिक पुण्यनगरी
30मे2019
-----------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार
-सूर्यकांत डोळसे

Wednesday, May 29, 2019

वंचितचे संचित

आ।ज।ची।वा।त्र।टि।का
--------------------------------
वंचितचे संचित
जो जो मातब्बर होता,
तो तो सत्तेपासून वंचित आहे.
हेच बहुजन आघाडीचे
लोकसभेतले संचित आहे.
ताणता ताणता तुटले गेले,
हेही खरोखर शल्य असेल !
जेवढी जिंकण्याची क्षमता,
तेवढेच उपद्रवमूल्य असेल !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-6961
दैनिक झुंजार नेता
29मे2019
------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार
-सूर्यकांत डोळसे

सोशल मीडिया स्पेशल

आ।ज।ची।वा।त्र।टि।का
--------------------------------
सोशल मीडिया स्पेशल
जिवंत असलेल्या माणसांनाही
इथे मारून मोकळे होतात.
आली पोस्ट, कॉपी-पेस्ट:
फॉरवर्ड करून मोकळे होतात.
आपल्याला वाहिलेल्या श्रद्धांजलीला,
आपल्या आंगठ्याने ठेंगावे लागते !
आपण जिवंत असल्याचेही,
आपल्याला ओरडून सांगावे लागते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5462
दैनिक पुण्यनगरी
29मे2019
------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com/

Tuesday, May 28, 2019

मतांतर

'पायल' की गुंज

आ।ज।ची।वा।त्र।टि।का
--------------------------------
'पायल' की गुंज
जिकडे बघावे तिकडे,
जातीय रॅगिंग चालू आहे.
नुसत्या कुत्सित नजरांनी,
जातीय टॅगिंग चालू आहे.
डॉक्टर तुम्हीसुद्धा?
असे म्हणायची वेळ आहे.
मोठा विकृत असा,
जातीयवादाचा खेळ आहे.
हेही समजू शकतो,
काहींना रिझर्वेशनचा राग आहे!
पण हेही समजून घ्यावे,
तो पिढयांपिढ्यांचा बॅकलॉग आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5461
दैनिक पुण्यनगरी
28मे2019
------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्व वाचक,प्रेक्षक, अभिप्रायदार,शेअरकर्ते,सहमतीदार, असहमतीदार,अंशतः सहमतीदार आणि निव्वळ बघे या सर्वांचे पुन्हा एकदा आभार
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com/

Monday, May 27, 2019

शुभेच्छांचा हैदोस!

व्हॉटसapp स्पेशल।वा।त्र।टि।का
----------------------------------- ---
शुभेच्छांचा हैदोस!
रोज नव्या दिवसाची
उत्साहाने उगवण असते.
वाढदिवस शुभेच्छांची
ग्रुप-ग्रुपवर हागवण असते.
256 सदस्य,365 वाढदिवस,
24x7 पोस्टींग सुरू असते.
देखल्या दिव्यांच्या प्रकाशात,
सहनशीलतेची टेस्टींग सुरू असते.
शुभेच्छा व्यक्तीगत द्याव्यात,
इतर पोस्टची कोंडी नको!
जिथल्या तिथे पाऊस पडावा,
ग्रुपवर मात्र बुळकांडी नको!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
#वात्रटिका
27मे2019
-------------------------------

क्रेडीट कार्ड

विस्ताराचा गर्भितार्थ

आ।ज।ची।वा।त्र।टि।का
--------------------------------
विस्ताराचा गर्भितार्थ
विधानसभेचे दिवस भरण्यापूर्वीच
पाळणा हालण्याची चाहूल आहे.
मंत्रिमंडळ विस्तारासोबतच
उपमुख्यमंत्रीपदाचाही कौल आहे.
कुणाला लिफ्ट,कुणाला गिफ़्ट,
कुणाचा पुनर्वसनावर जीव आहे !
साडेचार वर्षातल्या फाडाफाडीची,
जमेल तेवढी शिवा-शीव आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5460
दैनिक पुण्यनगरी
27मे2019
------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्व वाचक,प्रेक्षक, अभिप्रायदार,शेअरकर्ते,सहमतीदार, असहमतीदार,अंशतः सहमतीदार आणि निव्वळ बघे या सर्वांचे पुन्हा एकदा आभार
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com/

Sunday, May 26, 2019

पंचवार्षिक मुदतवाढ

आ।ज।ची।वा।त्र।टि।का
--------------------------------
पंचवार्षिक मुदतवाढ
दिल्लीचे स्वप्न भंगले,
जे ते आपल्या गावीच राहिले.
सगळे भावी पंतप्रधान,
अखेर भावी ते भावीच राहिले.
आपण पंतप्रधान होणारच,
त्यांचा विश्वास तसा गाढ आहे !
त्यांच्या 'भावी पंतप्रधान'पदाला,
आता पंचवार्षिक मुदतवाढ आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-6958
दैनिक झुंजार नेता
26मे2019
------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्व वाचक,प्रेक्षक, अभिप्रायदार,शेअरकर्ते,सहमतीदार, असहमतीदार,अंशतः सहमतीदार आणि निव्वळ बघे या सर्वांचे पुन्हा एकदा आभार
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com/

बोलके दुःख

daily vatratika...19march2024