Thursday, January 29, 2026

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक...
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com

मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..

आजचा अंक

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026
वर्ष- पाचवे
अंक -185 वा l पाने -60
अंक डाऊनलोड लिंक  -
https://drive.google.com/file/d/1V73CjWYgcrxteKl56gFzwCtwUSMB41FR/view?usp=drivesdk

काय आहे आजच्या अंकात?

1) ग्रोकायन 259
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2011 ते 2026 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या  20+ सदाबहार  वात्रटिका
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय
7) मला आवडलेली वात्रटिका
8) भूमिका
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

विशेष सूचना -ज्यांना अंक डाउनलोड होणार नाही किंवा करता येणार नाही त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये मला ॲड करा किंवा मला 99 23 847 269 या व्हाट्सअप क्रमांकावर मला दैनिक वात्रटिकाचा अंक पाठवा असा whatsapp करावा
https://suryakantdolase.blogspot.com
इथूनही आपण पूर्वीचे सगळे अंक डाऊनलोड करू शकतात.

Wednesday, January 28, 2026

पारंपरिक खंत ....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------------
पारंपरिक खंत
एकदा का दुराभिमानाचे वारे,
सुपीक डोक्यात शिरले जाते.
कुणाची केली जाते अवहेलना,
कुणाला दुर्लक्षाने मारले जाते.
दुराभिमान कशाचाही बाळगतात,
दुराभिमानाला कुठे अंत आहे ?
पुन्हा पुन्हा दुराभिमानी सोकावतात,
याचीही पारंपरिक खंत आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 77
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
28 जानेवारी 2026

जातीय अस्मिता....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
जातीय अस्मिता
जेवढ्या झोकदार झाल्या आहेत,
तेवढ्याच बाकदार झाल्या आहेत.
त्यापेक्षाही जास्त जातीय अस्मिता,
अधिकच टोकदार झाल्या आहेत.
उगीचच कुणालाही रोखले जाते,
उगीचच कुणालाही टोकले जाते.
जातीय अस्मितेच्या नावाखाली,
कुणावरतीही जहर ओकले जाते.
जातीने अस्मिता जोपासली की,
जात जातीला बरी वाटू लागते !
इतरांच्या अस्मिता खोट्या ठरवून,
आपलीच अस्मिता खरी वाटू लागते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9174
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
28 जानेवारी 2026

Tuesday, January 27, 2026

दैनिक वात्रटिका l 26 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -184 वा l पाने -66

दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक...
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com

मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका 
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..

आजचा अंक 

दैनिक वात्रटिका l 26 जानेवारी 2026
वर्ष- पाचवे
अंक -184 वा l पाने -66
अंक डाऊनलोड लिंक  -

काय आहे आजच्या अंकात? 

1) ग्रोकायन 258
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान 
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2011 ते 2026 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या  25+ सदाबहार  वात्रटिका 
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय
7) मला आवडलेली वात्रटिका
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

विशेष सूचना -ज्यांना अंक डाउनलोड होणार नाही किंवा करता येणार नाही त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये मला ॲड करा किंवा मला 99 23 847 269 या व्हाट्सअप क्रमांकावर मला दैनिक वात्रटिकाचा अंक पाठवा असा whatsapp करावा
https://suryakantdolase.blogspot.com
इथूनही आपण पूर्वीचे सगळे अंक डाऊनलोड करू शकतात.

Monday, January 26, 2026

विसंगती.....साप्ताहिक सरकारनामा वात्रटिका

 साप्ताहिक
वात्रटिका
--------------------------------

विसंगती

जे जिंकले त्यांचाही विश्वास बसत नाही,
जे हारले त्यांचाही विश्वास बसत नाही.
जनतेलाही राहून राहून वाटते,
निकालातला कौल आपला दिसत नाही.

आलेले उलट सुलट निकाल बघून,
हल्ली सगळेच कसे कोड्यात आहेत ?
सगळ्यांचे प्रश्नार्थक चेहरे विचारतात,
सांगा कोण कुणाकडून वेड्यात आहेत ?

मतदान यंत्र म्हणाले मार्कर पेनला,
नावडत्याची शाई पुसट पुसट आहे!
काल ज्यांनी एकमेकांचा दुस्वास केला,
आज त्यांचीच नेमकी मोठी घसट आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
साप्ताहिक सरकारनामा
वात्रटिका - 70
वर्ष- दुसरे
24जानेवारी 2026

बाजारीकरण ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
बाजारीकरण
आपण लोकशाहीप्रधान असल्याचा,
दरवेळी आपला आव वाढतो आहे.
निवडणूक कोणतीही असली तरी,
दरवेळी मतदारांचा भाव वाढतो आहे.
लोकशाहीचा मांडला बाजार,
बाजार बसव्यांचा वाव वाढतो आहे.
मतदारांची किंमत तर वाढली पाहिजे,
पण त्याचा बाजारभाव वाढतो आहे.
कुणी विकतो वॉर्ड आणि कॉलनी,
कुणी विकायला गाव काढतो आहे !
कुणाचाच कुणाला विरोध नाही,
बिनविरोधाचा नवा डाव वाढतो आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9173
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
26 जानेवारी 2026

Sunday, January 25, 2026

दैनिक वात्रटिका l 25 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे lअंक -183 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक...
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com

मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..

आजचा अंक

दैनिक वात्रटिका l 25 जानेवारी 2026
वर्ष- पाचवे
अंक -183 वा l पाने -60
अंक डाऊनलोड लिंक  -
https://drive.google.com/file/d/1gfiaIt5pGS7AiG8ighgjn9jBcBX7bPng/view?usp=drivesdk

काय आहे आजच्या अंकात?

1) ग्रोकायन 257
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2011 ते 2026 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या  25+ सदाबहार  वात्रटिका
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय
7) मला आवडलेली वात्रटिका
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

विशेष सूचना -ज्यांना अंक डाउनलोड होणार नाही किंवा करता येणार नाही त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये मला ॲड करा किंवा मला 99 23 847 269 या व्हाट्सअप क्रमांकावर मला दैनिक वात्रटिकाचा अंक पाठवा असा whatsapp करावा
https://suryakantdolase.blogspot.com
इथूनही आपण पूर्वीचे सगळे अंक डाऊनलोड करू शकतात.

कोडगेशाही....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
कोडगेशाही
हे जेवढे काही कोडगे आहेत,
ते त्यांच्याहीपेक्षा कोडगे आहेत.
तरीही सगळे सांगत राहतात,
आमचे सन्मानजनक तोडगे आहेत.
त्यांना सन्मानजनक वाटले तरी,
लोकांसाठी ते संतापजनक आहेत.
सगळ्यांच्याच राजकीय लाचारीचे,
राजकीय तोडगेच मानक आहेत.
कशालाही सन्मानजनक म्हणतात ,
एवढे सगळेच तऱ्हेवाईक आहेत !
त्यांना कशाचेच काही वाटत नाही,
सगळेच कोडगेशाहीचे पाईक आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9172
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
25 जानेवारी 2026

Saturday, January 24, 2026

दैनिक वात्रटिका l 24 जानेवारी 2026वर्ष- पाचवे...अंक -182 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक...
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com

मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका 
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..

आजचा अंक 

दैनिक वात्रटिका l 24 जानेवारी 2026
वर्ष- पाचवे
अंक -182 वा l पाने -60
अंक डाऊनलोड लिंक  -

काय आहे आजच्या अंकात? 

1) ग्रोकायन 256
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान 
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2011 ते 2026 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या  25+ सदाबहार  वात्रटिका 
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय
7) मला आवडलेली वात्रटिका
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

विशेष सूचना -ज्यांना अंक डाउनलोड होणार नाही किंवा करता येणार नाही त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये मला ॲड करा किंवा मला 99 23 847 269 या व्हाट्सअप क्रमांकावर मला दैनिक वात्रटिकाचा अंक पाठवा असा whatsapp करावा
https://suryakantdolase.blogspot.com
इथूनही आपण पूर्वीचे सगळे अंक डाऊनलोड करू शकतात.

पॉवर मॅजिक....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------------
पॉवर मॅजिक
निवडणूकपूर्व वेगळ्या असतात,
निवडणूकोत्तर वेगळ्या असतात.
युत्या असोत किंवा आघाड्या,
अशाच तर सगळ्या असतात.
निवडणूकपूर्व आणि निवडणूकोत्तर,
त्यांच्याकडे त्याचे लॉजिक असते !
खरे सत्य असे की,
ही सगळे पॉवर मॅजिक असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 76
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
24 जानेवारी 2026

विलीनीकरणाची चर्चा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
विलीनीकरणाची चर्चा
फटाफूट ते विलीनीकरण,
हे तर राजकीय चक्र आहे.
त्यांचे ते बिनधास्त असतात,
आपल्याला मात्र फिक्र आहे.
हे सगळे घडत राहील,
हे पुन्हा पुन्हा घडलेले आहे.
त्यांना सोडून आपल्यालाच,
त्यांच्या चिन्हाचे पडलेले आहे.
वेगळी परिस्थिती त्यावेळी होती,
वेगळी परिस्थिती यावेळी आहे !
उद्या ते आपल्याला सांगू शकतात,
ही आमची राजकीय खेळी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9171
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
24 जानेवारी 2026

Friday, January 23, 2026

दैनिक वात्रटिका l 23 जानेवारी 2026वर्ष- पाचवेअंक -181 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक...
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com

मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..

आजचा अंक

दैनिक वात्रटिका l 23 जानेवारी 2026
वर्ष- पाचवे
अंक -181 वा l पाने -60
अंक डाऊनलोड लिंक  -
https://drive.google.com/file/d/1CSmdDPge7GBr868xyiSN-im5CnSIZ6Sn/view?usp=drivesdk

काय आहे आजच्या अंकात?

1) ग्रोकायन 255
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2011 ते 2026 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या  25+ सदाबहार  वात्रटिका
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय
7) मला आवडलेली वात्रटिका
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

विशेष सूचना -ज्यांना अंक डाउनलोड होणार नाही किंवा करता येणार नाही त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये मला ॲड करा किंवा मला 99 23 847 269 या व्हाट्सअप क्रमांकावर मला दैनिक वात्रटिकाचा अंक पाठवा असा whatsapp करावा
https://suryakantdolase.blogspot.com
इथूनही आपण पूर्वीचे सगळे अंक डाऊनलोड करू शकतात.

ज्याचे त्याचे रंगकाम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
ज्याचे त्याचे रंगकाम
ज्याला ज्या पाहिजे त्या रंगात,
लोकांना खुशाल झिंगवून घ्या.
ज्याला ज्या पाहिजे त्या रंगात,
देशाला खुशाल रंगवून घ्या.
एकाने माती खाल्ली म्हणून,
दुसऱ्यानेही माती खाल्ली आहे.
एकमेकांच्या उरावरती,
तुमची रंगवा रंगवी चालली आहे.
तुमच्या राजकीय लढाईमध्ये,
धार्मिकता हीच तुमची ढाल आहे !
तुम्हालासुद्धा माहिती आहे,
सर्वांच्या रक्ताचा रंग लाल आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9170
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
23 जानेवारी 2026

Thursday, January 22, 2026

निष्ठेची ट्वेंटी-ट्वेंटी ... आजची वात्रटिका

आजची वात्रटिका 
----------------------------

निष्ठेची ट्वेंटी-ट्वेंटी

पक्षीय निष्ठेची व्याख्या, 
दिवसा दिवसाला घटते आहे.
पूर्वी निष्ठा कसोटी वाटायची,
आता ट्वेंटी-ट्वेंटी वाटते आहे.

बदलते राजकारण, 
क्रिकेटसारखे गतिमान आहे !
शेवटी रिझल्ट महत्त्वाचा, 
बघू नका कोण नीतिमान आहे ?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
----------------------------
आजची वात्रटिका - 75
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
22जानेवारी 2026

राजकीय ऑफर्स

आजची वात्रटिका 
-----------------------

*राजकीय ऑफर्स*

जशी इकडूनही ऑफर आहे,
तशी तिकडूनही ऑफर आहे. 
आपण फक्त तुलना करायची, 
कोण जादा लोफर आहे?

जसा सिझन तशी ऑफर,
त्यांचा ठोक्यामागे ठोका आहे.
राजकीय ऑफरचा तर, 
सगळीकडूनच धमाका आहे.

राजकीय सत्तेच्या स्पर्धेमध्ये,
ऑफरची री ओढत  आहेत !
कुणाचाच कुणाला वेळ नाही,
कशावर काय फ्री ओढत आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9169
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
22जानेवारी 2026
---------------------------
नमस्कार,
मराठी वात्रटिका
*विशेष सूचना-*
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करा.
२)सदरील वात्रटिकमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला कळवा.
३) वैयक्तिक अभिप्रायाचे स्वागत.
जे वात्रटिका शेअर करत आहेत त्यांचे विशेष आभार.
4) माझ्या प्रसिद्ध असलेल्या 19 हजारांपेक्षा जास्त वात्रटिका  पैकी  10 हजार पेक्षा जास्त वात्रटिका एका क्लिकवर वाचू शकता
https://suryakantdolase.blogspot.com/?m=1
५) माझ्या बाल वात्रटिका वाचण्यासाठी क्लिक करा
https://balsuryakanti.blogspot.com
६) सर्व काही एकाच ठिकाणी...एकाच ठिकाणी !! अर्थात *सप्ताहिक* *सूर्यकांती* खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पाहिले आणि एकमेव साप्ताहिक https://weeklysuryakanti.blogspot.com
7) माझ्या *सूर्यकांती लाईव्ह* किंवा यूट्यूब चॅनलला कृपया भेट द्या...लाईक करा...*सबस्क्राईब* करा !! https://www.youtube.com/user/suryakantdolase
8 )आजपर्यंतचे सर्व वात्रटिका संग्रह डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
https://vatratikaebooks.blogspot.com
९)माझ्या शेकडो कविता वाचण्यासाठी क्लिक करा
https://surykanti.blogspot.com
१०) माझ्या विडंबन कविता वाचण्यासाठी किलक करा..
https://suryakanti1.blogspot.com
११) माझ्या वात्रटिकांचे समीक्षण अर्थात ग्रोकायन वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://grokaayan.blogspot.com/
१२) मोबाईलवर दररोज वात्रटिकांचे सर्व प्रकारचेअपडेट मिळवण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करून माझ्या व्हाट्सअप चॅनल  मध्ये जॉईन होऊ शकता.
.https://whatsapp.com/channel/0029Vb6SsxH0gcfSYNSWgo1s
प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-सूर्यकांत डोळसे

Wednesday, January 21, 2026

विकतचे अनुभव .....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका 
-------------------------------

विकतचे अनुभव 

कालपर्यंत जे जे कडू होते, 
तेच आज त्यांचे भिडू आहेत. 
लोकांचे राजकीय अनुभव, 
आज नको तेवढे कडू आहेत.

लोक तर विकाऊ आहेत, 
लोक वेळोवेळी विकले आहेत !
आपल्या कडवट अनुभवातून,
वाटेना लोक काही शिकले आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 74
वर्ष - पहिले
दैनिक मराठवाडा नेता
21 जानेवारी 2026
 
वाटा - घाटी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
वाटा - घाटी
एक वेळेस सत्ता मिळविणे सोपे,
पण सत्ता वाटप अवघड होऊन जाते.
सत्ता आपला झटका,
अगदी भल्याभल्यांना देऊन जाते.
कितीही लपवला गेला तरी,
सर्वांचा रुसवा फुगवा दिसला जातो.
कुणी कुणी हाती बंडाचा झेंडा घेऊन,
सरळ दुसऱ्यांच्या गोटात घुसला जातो.
राजकीय माकडचाळे बघून,
दोन बोक्यांची गोष्ट आठवली जाते !
दोघांच्या भांडणांमध्ये मात्र,
सत्ता तिसऱ्याकडूनच पटवली जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9168
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
21 जानेवारी 2026

Tuesday, January 20, 2026

आदर आणि अनादर....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------------
आदर आणि अनादर
सत्तेच्या राजकीय नाट्याचा,
नवा नवा अंक सादर केला जातो.
नाटकाचा उघडा तमाशा होऊन,
जनमताचा अनादर केला जातो.
निवडणुकीच्या निकालानंतर,
कधीही यापेक्षा वेगळे चित्र नाही !
जणू जनमताचा कौलच सांगतो,
जनताच आदरासाठी पात्र नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 73
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
20 जानेवारी 2026

पण लक्षात कोण घेतो?...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
पण लक्षात कोण घेतो?
जेलच्या बाहेरचेही निवडून येतात,
जेलच्या आतलेही निवडून येतात.
आरोपी आणि गुन्हेगारांबरोबर,
जनतेला गुंडही आवडून जातात.
लोकशाहीवरती उगवलेला,
जणू हा मतदारांचा सूड असतो.
आपण ज्यांना गुंड मवाली म्हणतो,
जनतेसाठी तो रॉबिन हूड असतो.
मतदार राजाचे हे औदार्य,
तुम्हा आम्हाला नीट कळाले पाहिजे !
समाजातील प्रत्येक घटकाला,
पुरेसे प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9167
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
20 जानेवारी 2026

Monday, January 19, 2026

विश्वास अविश्वास....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------------
विश्वास अविश्वास
सत्तेसाठी साम-दाम-दंड-भेदाचे,
सगळेच्या सगळे मार्ग धुंडले जातात.
निवडून आलेले आपले प्रतिनिधी,
म्हणूनच हॉटेलमध्ये कोंडले जातात.
लोकप्रतिनिधीच्या कोंडाकोंडीमुळे,
लोकशाहीचीही धाकधूक वाढली जाते !
हॉटेल पॉलिटिक्स,डिनर डिप्लोमासी,
यांच्या जोडीला सहलही काढली जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 72
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
19 जानेवारी 2026

पुनर्प्रवेश .....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
पुनर्प्रवेश
आपल्या पक्षाला सोडून गेलेले,
हळूहळू परत यायला लागले.
सगळ्याच राजकीय पक्षात
आता पुनर्प्रवेश व्हायला लागले.
सगळ्याच नेत्यांच्या पुनर्प्रवेशाची,
अगदी सेम टू सेम गोष्ट आहे.
घर का ना घाट का..
अवस्था झाल्याचे स्पष्ट आहे.
प्रत्येकाच्या पक्षांतराबरोबर,
पुनर्प्रवशाची सारखीच तऱ्हा आहे !!
कुणाचा कितव्यांदा पुनर्प्रवेश?
याचा पंचनामा न केलेला बरा आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9166
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
19 जानेवारी 2026

Sunday, January 18, 2026

दैनिक वात्रटिका l 18 जानेवारी 2026वर्ष- पाचवेअंक -180 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक...
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com

मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका 
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..

आजचा अंक 

दैनिक वात्रटिका l 18 जानेवारी 2026
वर्ष- पाचवे
अंक -180 वा l पाने -60
अंक डाऊनलोड लिंक  -

काय आहे आजच्या अंकात? 

1) ग्रोकायन 254
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान 
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2011 ते 2026 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या  25+ सदाबहार  वात्रटिका 
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय
7) मला आवडलेली वात्रटिका
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

विशेष सूचना -ज्यांना अंक डाउनलोड होणार नाही किंवा करता येणार नाही त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये मला ॲड करा किंवा मला 99 23 847 269 या व्हाट्सअप क्रमांकावर मला दैनिक वात्रटिकाचा अंक पाठवा असा whatsapp करावा
https://suryakantdolase.blogspot.com
इथूनही आपण पूर्वीचे सगळे अंक डाऊनलोड करू शकतात.

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...