Monday, January 19, 2026

विश्वास अविश्वास....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------------
विश्वास अविश्वास
सत्तेसाठी साम-दाम-दंड-भेदाचे,
सगळेच्या सगळे मार्ग धुंडले जातात.
निवडून आलेले आपले प्रतिनिधी,
म्हणूनच हॉटेलमध्ये कोंडले जातात.
लोकप्रतिनिधीच्या कोंडाकोंडीमुळे,
लोकशाहीचीही धाकधूक वाढली जाते !
हॉटेल पॉलिटिक्स,डिनर डिप्लोमासी,
यांच्या जोडीला सहलही काढली जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 72
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
19 जानेवारी 2026

 

No comments:

विश्वास अविश्वास....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------------- विश्वास अविश्वास सत्तेसाठी साम-दाम-दंड-भेदाचे, सगळेच्या सगळे मार्ग धुंडले जातात. निवडून आलेले...