Monday, January 12, 2026

राजकीय फंडे.....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
राजकीय फंडे
हल्ली कुणाच्याही हाती,
बघा कुणाचेही झेंडे आहेत.
कुणाच्याही झेंड्याला,
बघा कुणाचेही दांडे आहेत.
दांडे वेगळे; झेंडे वेगळे,
प्रचाराचेही वेगळे फंडे आहेत !
स्वतःबरोबर मतदारालाही,
सगळ्याकडूनच गंडे आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 67
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता

 

No comments:

daily vatratika...12jane2026