आजची वात्रटिका
-----------------------
अपरिहार्यता
जसा काळ कुणासाठी थांबत नाही,
तसे राजकारणही थांबत नाही.
कुणाची जागा कुणीतरी घेते,
लांबवयाचे म्हटले तरी लांबत नाही.
जणू काळाप्रमाणे राजकारणाला,
सुखदुःखाची जाणीव असत नाही.
काळ आणि राजकारणही,
कुणासाठीच कधी रडत बसत नाही.
कुणाची नजर असते दूषित,
कुणाची नजर मात्र साफ असते !
कुणाला चुकीचे वाटो वा बरोबर,
राजकारणात सगळेच माफ असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9176
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
31 जानेवारी 2026

No comments:
Post a Comment