Thursday, January 8, 2026

पक्षांतर ते पक्षभ्रमण.... आजची वात्रटिका


आजची वात्रटिका 
-------------------------------

पक्षांतर ते पक्षभ्रमण 

कुणीही कुणाच्या पक्षात घुसतो, 
हे राजकीय अतिक्रमण होते आहे.
पक्षांतर हे पक्षांतर राहिलेच नाही,
ते तर आता पक्षीय भ्रमण होते आहे.

अतिक्रमणाकडून पक्षीय भ्रमणाकडे, 
राजकीय पक्षांतराची वाटचाल आहे !
तरीही ते प्रतिपादन करत राहतात, 
आमची आणि आमचीच लाल आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 65
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
8 जानेवारी 2026

No comments:

गटार आणि गंगा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- गटार आणि गंगा राजकारणात हाही नंगा आहे, राजकारणात तोही नंगा आहे. राजकारणच सांगू लागले, मी म्हणजे गटारग...