Monday, January 19, 2026

पुनर्प्रवेश .....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
पुनर्प्रवेश
आपल्या पक्षाला सोडून गेलेले,
हळूहळू परत यायला लागले.
सगळ्याच राजकीय पक्षात
आता पुनर्प्रवेश व्हायला लागले.
सगळ्याच नेत्यांच्या पुनर्प्रवेशाची,
अगदी सेम टू सेम गोष्ट आहे.
घर का ना घाट का..
अवस्था झाल्याचे स्पष्ट आहे.
प्रत्येकाच्या पक्षांतराबरोबर,
पुनर्प्रवशाची सारखीच तऱ्हा आहे !!
कुणाचा कितव्यांदा पुनर्प्रवेश?
याचा पंचनामा न केलेला बरा आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9166
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
19 जानेवारी 2026

 

No comments:

विश्वास अविश्वास....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------------- विश्वास अविश्वास सत्तेसाठी साम-दाम-दंड-भेदाचे, सगळेच्या सगळे मार्ग धुंडले जातात. निवडून आलेले...