Saturday, January 17, 2026

निकालाची तिसरी बाजू.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

निकालाची तिसरी बाजू

विजयाबरोबर पराभवसुद्धा,
सहज पचवता आला पाहिजे.
निकालाचा कडू घोट सुद्धा,
सहज रिचवता आला पाहिजे.

जिंकले आणि हरलेल्यांनाही,
हाच आमचा सबुरीचा सल्ला आहे.
कारण लोकशाहीच्या नावाने,
सगळ्याच बाजूने कल्ला आहे.

पराभवाच्या आणि विजयाव्याही,
कारणांचा जेंव्हा पत्ता लागत नाही !
तेव्हा आपण समजून घ्यावे,
सत्ता लागते की सत्ता लागत नाही ?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9164
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
17 जानेवारी 2026
 

No comments:

सोयीस्कर अर्थ.....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------------- सोयीस्कर अर्थ लोकशाहीच्या विजयाबरोबर, पराभवाचासुद्धा डंका आहे. अशा उलट सुलट दाव्यामुळे, लोकां...