Monday, January 5, 2026

जाहीरनाम्यांची नामावली.... आजची वात्रटिका


आजची वात्रटिका 
-------------------------------

जाहीरनाम्यांची नामावली

जुन्याच आश्वासनांची, 
पुन्हा नव्याने कॉपी पेस्ट आहे. 
तरीही सर्वांचेच दावे, 
आमचा जाहीरनामा बेस्ट आहे. 

प्रत्येकाच्या थपोलॉजीचे,
आता वेगवेगळे दावे आहेत!
प्रत्येकाच्या जाहीरनाम्याला, 
म्हणूनच वेगवेगळी नावे आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 63
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
5 जानेवारी 2026

No comments:

ब्रेकिंग न्यूज...आजची वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------------- ब्रेकिंग न्यूज कधी बातम्या मारल्या जातात, कधी बातम्या पेरल्या जातात. मारामारी आणि पेरापेरी बघ...