Saturday, January 31, 2026

वित्तंम बातमी...आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
वित्तंम बातमी
कुणी म्हणे बेपत्ता झाले,
कुणी म्हणे फरार आहे.
आकडेवारीच्या खेळात,
अपहरणाचाही थरार आहे.
देवदर्शन आणि सहलीची,
थरार नाट्याला चटक आहे!
लोकशाहीची वित्तंम बातमी,
त्रोटक पण स्फोटक आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
आजची वात्रटिका - 79
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
31 जानेवारी 2026

 

No comments:

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...