Saturday, January 3, 2026

गुंडशाहीचे विश्लेषण....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

गुंडशाहीचे विश्लेषण
राजकीय गुंडगिरीविरुद्ध बोलताना,
टीकाकारांना एवढे तरी कळायला हवे.
किमान गुंडांच्या वाढत्या संख्येएवढे,
त्यांना प्रतिनिधित्व मिळायला आहे.
वाल्याचे वाल्मिकी करून दाखवतो,
जणू राजकीय पक्षांची ग्वाही आहे !
जी सर्वांचे कल्याण साधू शकते,
तिचे नाव भारतीय लोकशाही आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 62
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
3 जानेवारी 2026

 

No comments:

जाहीरनाम्यांची नामावली.... आजची वात्रटिका

आजची वात्रटिका  ------------------------------- जाहीरनाम्यांची नामावली जुन्याच आश्वासनांची,  पुन्हा नव्याने कॉपी पेस्ट आहे.  तरी...