आजची वात्रटिका
-------------------------------
कधी बातम्या मारल्या जातात,
कधी बातम्या पेरल्या जातात.
मारामारी आणि पेरापेरी बघून,
बातम्या मनात झुरल्या जातात.
बातम्या जेवढ्या नेक असतात,
तेवढ्याच बातम्या फेक असतात !
सर्वात आधी सर्वात प्रथम देताना,
ब्रेकिंगला ब्रेकिंगचे चेक असतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
आजची वात्रटिका - 64
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
6 जानेवारी 2026

No comments:
Post a Comment